अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » मानवी मुल्यांसाठी कलासक्त असणे आवश्यक – वैशाली राजमाने

मानवी मुल्यांसाठी कलासक्त असणे आवश्यक – वैशाली राजमाने

मानवी मुल्यांसाठी कलासक्त असणे आवश्यक – वैशाली राजमाने

सातारा -गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय सातारा ( पाटखळ माथा ) सातारा व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था म. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ,18, 19 फेब्रुवारी 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे 28 वे वार्षिक कला प्रदर्शन दिनांक 19 फेब्रुवारी अखेर दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह कन्या शाळे पाठीमागे शनिवार पेठ सातारा येथे सुरू आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्रीमती वैशाली राजमाने (उप- जिल्हाधिकारी ) सातारा यांच्या हस्ते दिनांक 17 रोजी पार पडले, यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री शिरीष चिटणीस (संस्थापक चेअरमन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ) प्रा. मा.श्री रमेश ओहोळ (सेवानिवृत्त प्राध्यापक ) तसेच पुणे येथील व्यावसायिक चित्रकार विवेक दहिवले यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री डॉ.अनिरुद्ध जगताप (संचालक, सदस्य गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी सातारा ) यांनी भूषवले याच दिवशी विवेक दहिवले या चित्रकारांनी व्यक्तिचित्रण या प्रकारात प्रत्यक्ष व्यक्तिचित्रणाचे चित्र प्रात्यक्षिक सादर केले.यावेळी उद्घाटक वैशाली राजमाने यांनी सर्वसामान्य व्यक्ती व कलावंत यातील कलावंताचा असणारा उजवेपणा तसेच प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या प्रक्रियेतील कोणती ना कोणती ललित कला प्रत्येकाने जोपासण्याच्या दृष्टीने करावयाचे किंवा आवश्यक असणारे प्रयत्न या दृष्टीने मार्गदर्शन केले.श्री शिरीष चिटणीस यांनी नुकत्याच गेल्या दिवाळीमध्ये दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर कला महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी वर्षा माने खरटमल हिच्या चित्रकृतीची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.या दृष्टीने मूकबधिर विद्यार्थी ही या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अतिशय उच्च स्तरावर कलेची सेवा व नावलौकिक कशा पद्धतीने मिळवत आहेत याबद्दल उपस्थितांना, तसेच कला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, रमेश ओहोळ सरांनी त्यांच्या एकूण कला अस्वावादक भूमिके नुसार विविध देशांमध्ये दिलेल्या विविध म्युझियमना भेटी तसेच या म्युझियमची कला वैशिष्ट्ये यातील निवडक चित्रकृती व त्या चित्रकृतींचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया विशद केली. विवेक दहिवले यांनी प्रदर्शनातील सादर केलेल्या कलाकृतींचे कौतुक केले तसेच भविष्यातील सुधारणांबद्दल काय वाव आहे याबद्दलही मार्गदर्शन केले.

डॉक्टर अनिरुद्ध जगताप यांनी चित्रकलेच्या अनुषंगाने व्यावसायिक स्तरावर असणारी विविध शक्यता जसे व्हिज्वलायझेशन, फिल्म इंडस्ट्री, ॲनिमेशन इंडस्ट्री या दृष्टीने चित्रकारांनी व्यावसायिक बाबी कशा तपासल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन केले या उद्घाटन समारंभ नंतर सादर केलेल्या व्यक्तिचित्रणा बाबत कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या द्वारे दिले गेलेले मानधन विवेक दहिवले यांना वितरित करण्यात आले त्यांचे महाविद्यालयामार्फत सन्मानपत्र तसेच मानधन देऊन प्रदर्शनाचे मुख्य अतिथी श्रीमती वैशाली राजमाने मॅडम तसेच प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      या प्रदर्शनातील दुसरे पुष्प हे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी कॅमल आयोजित सायन्स बिहाइंड कलर्स या कार्यक्रमाद्वारे गुंफले जाणार आहे, तसेच त्याच दिवशी दुपारी चार वाजता माजी कलाशिक्षक संजय नाईक, डॉक्टर श्याम बडवे , श्री विनायक भोसले ,श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते बक्षीस समारंभ नियोजित केला आहे सदर कलाप्रदर्शनासाठी सातारकर कला रसिकांनी आवर्जून भेट द्यावी कला शिक्षणातील विविध अभ्यासक्रम व त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी केलेली कला मांडणी याचा कलाआस्वाद घ्यावा असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांनी केले, यावेळी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन ऋतुजा लोहार, गायत्री गायकवाड यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket