मंजु इन्स्टिट्युट च्या विद्यार्थ्याची सौदी अरेबिया एअर लाइन्स कीचन साठी निवड
मंजु इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.ही संस्था गेली २८ वर्ष झाली शैक्षणिक क्षेत्रामध्ये अविरत सेवा करीत आहे.या संस्थेचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केलेल्या संदेश नलवडे या विद्यार्थ्यांची NESMA CATERING ,SOUDI AIRLINES साठी सौदी अरेबिया मध्ये निवड झाली.या निवडीमुळे पालक वर्गातून व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.संस्थेचे प्राचार्य श्री.अनिल महादेव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.संस्थेचे बरेच विद्यार्थी भारतामध्ये व परदेशामध्ये दुबई , ओमान,कतार,मस्कत,अमेरिका,साऊथ आफ्रिका, सिंगापूर, मलेशिया,पॅरिस,येथे कार्यरत आहेत.
हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी-१ वर्ष, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट -२ वर्ष,बी.एस.सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज-३ वर्ष, डिप्लोमा इन आर्किटेक्ट ड्राफ्ट्समन – २, डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग -१ व २ वर्ष डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग १ व २ वर्ष या कालावधीचे अभ्यासक्रम संस्थेमध्ये राबविले जातात.
संस्था नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देण्याचे काम देखील करते.कोर्स साठी १० वी व १२ वी शैक्षणिक पात्रता असून एस. टी.पास ,हॉस्टेल ची सुविधा उपलब्ध आहे.ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे.त्याविद्यार्थ्यांनी मंजु इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथे त्वरित संपर्क साधावा.९९६०१३५९१५/०२१६२-२२२५४५/७५५८३३२६३८