Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मांढरदेव येथे शिवजयंती उत्सव शिवमय वातावरणात उत्साहात संपन्न

मांढरदेव येथे शिवजयंती उत्सव शिवमय वातावरणात उत्साहात संपन्न

मांढरदेव येथे शिवजयंती उत्सव शिवमय वातावरणात उत्साहात संपन्न

आज दि.२९ मांढरदेव येथे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा शिवजयंती उत्सव शिवमय वातावरणात संपन्न. 

       लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव गावामध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या अनेक पिढ्यांपासून अविरत सुरू आहे.या शिवजयंती उत्साह करिता मांढरदेवी येथील नवतरुण युवकांकडून शिवरायांच्या गड किल्ल्यावरून ज्योत प्रज्वलित करून ती आपल्या गावी आणण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षां पासून सुरू आहे.या वर्षी हि ज्योत किल्ले विसापूर पनवेल येथून आणण्याचे नियोजन या युवकांनी कडून करण्यात आले.त्यासाठी गावातील 70 ते 80 तरुण ज्योत आणण्यासाठी किल्ले विसापूर या ठिकाणी गेले होते.तेथे जाऊन त्यांनी गडावरील शिव मंदिरामध्ये दर्शन घेऊन तेथेच ज्योतीचे प्रज्वलन केले.आणि त्यानंतर प्रत्येक युवकाने आपला सहभाग देत तेथून मांढरदेवीपर्यंत साधारणता १७५ किलोमीटर ज्योत धावत घेऊन आले.

या सर्व प्रवासामध्ये त्यांना वाटे मध्ये अनेक शिवभक्तांनी त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने मदतीचे हात दिले.त्यामध्ये त्यांना कोणी पाणी बॉटलचे वाटप केले.तर कोणी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी लागणारे साहित्य देऊ केले.भोर मध्ये ज्योतीचे आगमन झाल्यानंतर तेथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून या युवकांनी मांढरदेवीकडे प्रस्थान केले.मजल दरमजल करत घाट रस्त्याने सकाळी 11 वाजता या सर्व युवकांचे मांढरदेव गाव मध्ये आगमन झाले.त्यानंतर ज्योत गावातील महिलांच्या व मुलींच्या हातात देण्यात आली.आणि ती ज्योत घेऊन या महिला काळुबाई देवीच्या मंदिरात गेल्या.ज्योत देवीला भेटवून तिची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. 

         शिवजयंती उत्साह निमित्त या सर्व युवकांकडून गावातील सर्व ग्रामस्थांना रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.व त्यानंतर शाळेतील लहान मुलांचा पारंपारिक संगीतमय गाण्याचा व नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यास हि गावातील सर्व शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.व अशा पद्धतीने त्या उत्सवाची सांगता करण्यात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माहिती अधिकार सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त सुशांत मोरे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित ; प्रशासनाकडून विविध मागण्या मान्य 

Post Views: 43 माहिती अधिकार सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त सुशांत मोरे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित ; प्रशासनाकडून विविध मागण्या मान्य 

Live Cricket