Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माळेगाव सहकार साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांची बाजी

माळेगाव सहकार साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांची बाजी

माळेगाव सहकार साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांची बाजी, बळीराजा पॅनेलचा पराभव

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या पहिल्या कलानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलने आघाडी घेतली आहे. ‘ब’ गटातून खुद्द अजित पवार ९१ मते मिळवून विजयी झाले आहेत. याउलट, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘बळीराजा पॅनेल’चे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना फक्त १० मते मिळाली आहेत.

बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सत्ता मिळवण्यासाठी यावेळी चार पॅनेल मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा पॅनेल’, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनेल’, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनेल’ आणि शेतकरी संघटनांचे पॅनेल मैदानात आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 59 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket