Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माहिती अधिकार सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त सुशांत मोरे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित ; प्रशासनाकडून विविध मागण्या मान्य

माहिती अधिकार सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त सुशांत मोरे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित ; प्रशासनाकडून विविध मागण्या मान्य 

माहिती अधिकार सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त सुशांत मोरे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित ; प्रशासनाकडून विविध मागण्या मान्य 

पुनवर्सन कार्यालयाबाबत तीव्र संताप; भर उन्हात पुकारले होते उपोषण 

सातारा दि.२९: सामाजिक, माहिती अधिकार व पर्यावरणवादी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कडाक्याच्या उन्हात आमरण उपोषण पुकारले होते. दरम्यान श्री. मोरे यांनी केलेल्या अनेक मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने तसेच काही विषयांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने श्री. मोरे यांनी महसूल उप जिल्हाधिकारी श्री विक्रांत चव्हाण साहेब यांचे हस्ते लिंबूसरबत घेऊन आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. 

यावेळी, सातारा वनविभागातील निकृष्ट दर्जाचे सिमेंट बंधारे, विविध बांधकामे, वृक्षलागवडीबाब योग्य ती कारवाई करणे बाबी सदरचे ठेकेदार, अधिकारी यांच्याबाबत केलेल्या तक्रार अर्जावर कोणतेही कारवाई केलेली नाही. याबाबत मा. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाला सातारा जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज,सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, प्रदीप रौंदळ या तीनही अधिकाऱ्यांनी हरताळ फासलेला आहे.

निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या तसेच संबंधित ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन आपले पोट भरणाऱ्या तत्कालीन सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणेकामी अपयशी ठरलेल्या या तिन्ही अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच निकृष्ट बंधारे, लावलेली झाडे आणि झालेला खर्च याबाबत मा. हरित न्यायालयात दाद मागण्याची भूमिका यापुढे घेण्यात आलेली आहे. तसेच सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयामध्ये नेमले गेलेले कंत्राटी कामगार हे एजंट झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रकरणावर तात्काळ कारवाई केली जाते,खाजगी एजंट हे तळ ठोकून कार्यालयात बसतात सामान्य नागरिक, प्रकल्पग्रस्त यांच्याकडून आलेल्या कामांची यांनी दिलेल्या अर्जावर कारवाई करण्याऐवजी आपण सादर केलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत त्यामुळे आपला अर्ज निकाली काढत आहेत असे उत्तर देऊन एजंटामार्फत आलेल्या अर्जावर कारवाई करून आर्थिक तुंबडी भरणाऱ्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील एजंट आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी याबाबत मा. महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या दालनात झालेल्या बैठकीत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आजचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे.

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रार अर्जावरती सखोल चौकशी होऊन संबंधित जन-वन समितीचे अध्यक्ष यांच्यावर कारवाई होऊन नवीन समिती नेमण्यात आलेली आहे. तसेच झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू असल्याचे आश्वासन लेखी आश्वासन सहाय्यक वनसंरक्षक श्री. हाके यांनी दिले आहे. 

मौजे पेट्री येथील सुनीता महाडिक यांनी बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामाला नोटीस देऊन संबंधित सर्कल यांचेवर कारवाई करणेचे आश्वासन तहसीलदार सातारा यांनी दिले.तसेच सातारा तालुक्यातील तहसील विभागातील मौजे नागठाणे, मौजे काशीळ, मोजे सोनगाव येथील कारवाईबाबत आश्वासन तहसीलदार सातारा यांनी दिलेले आहे.

मौजे महाबळेश्वर येथील सर्वे नंबर 17/5 येथील मनीषा राजेश पाटील आणि जयंत यशवंत कोळेकर यांचे अनधिकृत बांधकाम तहसीलदार महाबळेश्वर यांनी पाडलेले आहे. तसेच मौजे वाडा कुंभरोशी, प्रतापगड येथील सर्वे नंबर 26/1 मधील अनधिकृत बांधकाम उत्खनन, वृक्षतोडी बाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच मौजे दुधोशी येथील श्री संतोष बबन शिंदे यांच्या अनधिकृत बांधकामावर व केलेल्या उत्खननावर दंडात्मक कारवाई मा. तहसीलदार महाबळेश्वर यांनी केलेली आहे.

वेळे ता. जावळी येथील 3 अपत्य असणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर निलंबन कारवाईचे आश्वासन रोहिणी ढवळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद सातारा यांनी लेखी दिले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket