अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » वंडर वुमेन्स प्रीमीयर लीगमध्ये महिला पोलिस संघ विजेता

वंडर वुमेन्स प्रीमीयर लीगमध्ये महिला पोलिस संघ विजेता

वंडर वुमेन्स प्रीमीयर लीगमध्ये महिला पोलिस संघ विजेता

पॉवर क्वीन्स या संघाने मिळवले उपविजेतेपद, स्पर्धेला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा प्रतिनिधी-सातारा येथील ॲस्ट्रोपॉड टर्फ, शाहूपुरी येथे आयोजित करण्यात आलेली वंडर वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूडब्ल्यूपीएल) सिझन 2 ही बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. अंतिम सामन्यात बीएनबी सुपर कॉप सातारा या महिला पोलिस संघाने उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले, तर पॉवर क्वीन्स या संघाने उपविजेतेपद मिळवले.

या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेत महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या सहभागाचे दर्शन घडवले. विजेता संघ हा सातारा जिल्हा महिला पोलीस दलातील खेळाडूंनी बनलेला असून, त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांनी अंतिम सामन्यात प्रभावी विजय नोंदवला. त्यांच्या खेळातील समन्वय, फिटनेस आणि आत्मविश्वास यामुळे प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

या स्पर्धेचे आयोजन वंडर वुमेन्स क्लब यांच्या वतीने करण्यात आले होते. महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सुरभी वखारिया, अभिलाषा दळवी, पायल शहा, श्रुती चव्हाण, राणी शहा, ऐश्वर्या पाटील, वृषाली भंडारी, तृप्ती भोईटे, भाग्यश्री लाहोटी, सुरभी लुणावत, अंकिता शहा आदी कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे साताऱ्यातील महिला बॉक्स क्रिकेटला नवी उभारी मिळत असून, भविष्यात अशा अधिक स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket