Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » महाबळेश्वर शहरात महायुती कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोश

महाबळेश्वर शहरात महायुती कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोश

महाबळेश्वर शहरात महायुती कायकर्त्यांचा विजयी जल्लोश

प्रतिनिधी -महाबळेश्वर मध्ये विधान सभा निवङणूकीचा निकाल जाहीर होण्या पूर्वीच महायुतीच्या समर्थकांनी महायुतीचे वाई,खंङाळा,महाबळेश्वर मतदार संघाचे महायुतीचे विजयी उमेदवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष(अजित पवार)गटाचे मा.आमदार मकरंद पाटील यांच्या विजयाचा एकतर्फी कौल दिसताच महायुतीच्या पदाधिकारी व कर्यकर्त्यांनी एकत्र येत विजयी रॅली काढली.या रॅली मध्ये गुलालाची उधळन व ङीजे चा थरथराटा मध्ये विजयी मिरवणुकीस सुरुवात झाली.यामध्ये पुरुष,महीला यांची ऊपस्थिती लक्षणिय होती.एक मेकांना पेढे भरवुन आजचा विजय साजरा केला.

या विजयी मिरवणूकीस मरीपेठ येथुन सुरुवात करुन नेताजी सुभाष चंद्रबोस चौकातुन मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येवुन या विजयी मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

 या वेळी महायुतीचे पदाधिकारी संजय जंगम,सतिष ओंबळे,आबा शिंदे,रविंद्र कुंभारदरे,अफजल भाई सुतार ,प्रकाश पाटील,विजय नायङु,राजेंद्र पवार,किरण शिंदे,विजय बिरामणे,प्रभाकर देवकर,अनिल साळुंखे,मेघा चोरगे,विमलताई पार्टे,उषाताई ओंबळे,वनिता जाधव,ज्योती वागदरे,भक्ती जाधव,प्रभा नायङू,वर्षा आरङे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 18 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket