Post Views: 8
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांना दिग्गज उमेदवारांचा पाठिंबा
२५८ माण-खटाव विधानसभा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. खटाव तालुक्यातील माण-खटावचे युवा नेते श्री.नंदकुमार मोरे, पंचायत समिती माजी सभापती श्री.संदीप दादा मांडवे, शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते श्री.अनिल पवार, श्री.सत्यवान कमाने, श्री.राजेंद्र बोडरे, डॉ. विकास देशमुख, जोस्ना सरतापे यांच्यासह एकूण बारा जणांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गेना पाठिंबा दर्शविला. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील प्रमुख नेते यांनी विशेष कष्ट घेतले त्याबद्दल प्रभाकर घार्गे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आभार मानले.