Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या शिक्षण विस्तार कार्याचा महाराष्ट्राचा महाब्रॅंड पुरस्काराने सन्मान

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या शिक्षण विस्तार कार्याचा महाराष्ट्राचा महाब्रॅंड पुरस्काराने सन्मान

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या शिक्षण विस्तार कार्याचा महाराष्ट्राचा महाब्रॅंड पुरस्काराने सन्मान

अत्याधुनिक अभ्यासक्रमांसह, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाचे सातत्य सिद्ध

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये, अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांसह इथे दिले जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणासाठी महाराष्ट्राचा महाब्रॅंड या पुरस्काराने पुणे येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि विधान परिषदेच्या सभापति निलम गोरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये चालू वर्षी मेकेट्रॉनिक्स इंजीनीरिंग,रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी यासारखे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. इंजीनियरिंगमध्ये या अत्याधुनिक विद्याशाखांसोबतच, फार्मसीमधील मोठ्याप्रमाणावर मागणी असणारा फार्म. डी. अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आला आहे.

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांसोबतच, दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या सर्व सोईसुविधा कॅम्पस मध्ये उपलब्ध आहेत.उच्चविद्याविभूषित आणि अनुभवी तज्ज्ञ शिक्षकवर्ग, अत्याधुनिक साधनसामुग्रीनी संपन्न असणारा प्रयोगशाळा, इंडस्ट्रीज् इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅबोरेटरीज, लॅंगवेज लॅबोरेटरी, डिजिटल लायब्ररी, खेळांसाठीचे सुसज्ज मैदान यासोबतच रिसर्च डेवलपमेंट सेल, इन्क्युबेशन सेल, प्लेसमेंट सेल या विभागामुळे. विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासाची प्रगती साध्य करता येते. 

यशोदा टेक्निकल कॅम्पसला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याबरोबर महाराष्ट्राचा महाब्रॅंड या पुरस्कारामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसला शिक्षण कार्यात प्रेरणा प्राप्त झाली असल्याचे मत यशोदा इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, प्रा. अजिंक्य सगरे यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये संस्थेची ही घोडदौड अशीच सुरू राहील, असेही ते म्हणाले. येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये यशोदा इंस्टीट्यूटच्या विश्वस्त आर्कि. स्वराली सगरे-भिलारे, यशोदा टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी, सहसंचालक प्रा. रणधीरसिंह मोहिते.ही उपस्थित होते.

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या या यशामध्ये कुलसचिव, सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांचे योगदान असल्याचे डॉ. विवेककुमार रेदासनी यांनी यावेळी सांगितले. 

महाराष्ट्राचा महाब्रँड या पुरस्काराच्या वितरण सोहळ्याप्रसंगी ना. अजितदादा पवार, सभापति निलम गोरे, प्रा. अजिंक्य सगरे, आर्कि. स्वराली सगरे-भिलारे आणि मान्यवर.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल

Post Views: 471 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल सातारा (अली मुजावर )साताऱ्यात आज

Live Cricket