Home » ठळक बातम्या » आरोग्य » पल्स’मुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार

पल्स’मुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार

पल्स’मुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉन्क्लेव्ह – ‘पल्स 2026’ कर्टन रेझर येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी ‘PULSE Global Medical Conference’च्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मानवी आरोग्यासाठी निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांवर यशस्वी मात करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. सध्या शासन, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राने एकत्र येऊन यावर उपाय काढण्याची आवश्यकता असून खासगी क्षेत्राने संशोधनातून अशा समस्यांवर उपाय काढावे. या परिषदेच्या आयोजनातून जागतिक स्तरावर असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल होतील. आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी ‘पल्स परिषद’ ही मोठी संधी आहे. या परिषदेकरिता जगभरातून जवळपास 130 नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक व संशोधक येणार आहेत. परिषद सुरू होईपर्यंत सध्याची युद्धजन्य परिस्थिती निवळून जाईल आणि तज्ज्ञ विनासायास परिषदेला येऊ शकतील. ही परिस्थिती कायम राहिली तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना परिषदेत सहभागी करून घेतले जाईल. 

या परिषदेत 20 सत्रांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील संशोधन, नवनवीन तंत्रज्ञान, परवडणाऱ्या खर्चात मिळू शकणारे उपचार, दुर्धर आजारांवरील उपचार यांविषयी चर्चा होणार आहे. परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पुढील प्रत्येक वर्षी अशी परिषद आयोजित व्हावी आणि या परिषदेच्या आयोजनातून आरोग्य यंत्रणा बळकट होईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

नवनवीन संशोधन, येणारे तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित ‘पल्स’ परिषदेत होणार आहे. या परिषदेचे आयोजन जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे 27 व 28 मार्च 2026 रोजी करण्यात येणार आहे.

यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अभिनेत्री सोहा अली खान व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket