देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू-आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत-जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुंबई व नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, गडचिरोलीत नवेगाव मोर ते सुरजागडदरम्यान चार पदरी महामार्गास मान्यता सातारा हॉस्पिटल व इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने माहूलीत आरोग्य तपासणी शिबिर म्हसवे गटात राष्ट्रवादी उमेदवारांसाठी आ. शशिकांत शिंदे यांचा झंजावती प्रचार दौरा कुंभरोशी गणात पंचरंगी ‘डोस’ राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या ताकदीसमोर अपक्षांचे आव्हान; निवडणूक चुरशीची होणार
Home » ठळक बातम्या » महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल!

महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल!

महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रामटेक, नागपूर येथे महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत रामटेक, नागपूर येथे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर (CIIIT)’ उभारण्यात येणार आहे.

खासगी सहभागातून उभारण्यात येणारे हे CIIIT केंद्र विद्यार्थ्यांना अत्याधुनिक नवउपक्रमांवर आधारित प्रशिक्षण देणार असून, औद्योगिक उत्पादन व रोजगाराला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे उपलब्ध होईल. कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधासह ₹115 कोटींचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे ₹98 कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेल्या रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या कौशल्यवर्धन केंद्रात इनोव्हेशन, डिझाईन, इन्क्युबेशन यासह 9 प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा राहणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू-आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू-आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर · महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल मुंबई- महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील

Live Cricket