Home » राज्य » प्रशासकीय » महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीण संदर्भात मोठी अपडेट! वनताराची टीम नांदणीला देणार भेट

महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीण संदर्भात मोठी अपडेट! वनताराची टीम नांदणीला देणार भेट

महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीण संदर्भात मोठी अपडेट! वनताराची टीम नांदणीला देणार भेट

कोल्हापूर -नांदणी येथील लोकभावना गुंतलेल्या ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणला अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यावर तिचे हस्तांतरण झाले. राज्यभर याचे पडसाद उमटू लागल्यानंतर वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने याची दखल घेतली आहे. खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी वनतारा टीमशी चर्चा केल्यानंतर भेट देण्याचे ठरले.

वनतारा सीईओ विहान करणी, जय पेंढारकर, साहिल शेख, अजित कुमार धनी राम सरोज, विजय शितोळे आणि खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व टीम कोल्हापूर साठी रवाना झाली आहे. खासदार धैर्यशील माने यांनी याचा पाठपुरावा केल्याचे बोलले जात आहे. वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी हे या ठिकाणी येऊन महाराजांची भेट घेणार आहेत.

जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यात श्रीकांत शिंदेंची भेट घेऊन लोकभावना सांगितली. यावर शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सर्वांना चार्टर विमानाची सोय करून दिली. या चर्चेच्या माध्यमातून विषयाचे गांभीर्य धैर्यशील माने यांनी पटवून दिले असल्याचे बोलले जात आहे. मठाचे अधिपती यांच्याशी चर्चा करून तडजोडीचा मार्ग शोधण्यासाठी तातडीने कोल्हापूर दौरा करत असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले “आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही

Live Cricket