Home » राज्य » शेत शिवार » महाबळेश्वर तालुक्यातील पारपार ग्रामपंचायत होणार गुलाबाचे गांव

महाबळेश्वर तालुक्यातील पारपार ग्रामपंचायत होणार गुलाबाचे गांव 

महाबळेश्वर तालुक्यातील पारपार ग्रामपंचायत होणार गुलाबाचे गांव 

सातारा(अली मुजावर )-गुलाबाचे फूल आणि प्रेमाचे नाते हे जगभर सर्वश्रुत आहे.सातारा जिल्ह्यात देशातील पहिले पुस्तकांचे गांव भिलार,मधाचे गांव मांघर असून आत्ता महाबळेश्वर मधीलच गुलाबांचे गांव व्हावे, ही संकल्पना सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (ceo) याशिनी नागराजन यांनी मांडली व ती तात्काळ ग्रामपंचायत पारपार ने स्वीकारली, त्यासं मा. BDO सर यशवंत भांड, तसेच सहायक BDO कांबळे साहेब यांनी सतत मार्गदर्शन व मोलाची साथ दिली. त्याचं बरोबर ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी श्री. शंकर चिकटूळ, सरपंच मनीषा सकपाळ, व ग्रामपंचायत कार्यकारणी यांनी तर झोकून देऊन कामाला लागले.व अल्पवधीत म्हणजे अवघ्या आठ ते दहा दिवसांत गावात साफ सफाई, खड़े खोडणे, झाडांची उपलब्धता करणे, ती लावून घेणे. जवळपास सध्या दीड हजार रोपांची लागवड केली असून, ते सातत्य कायम ठेवत अजून दीड हजार रोपे लावण्यात येणार आहेत.

मुळात पारपार गांव हे शिव कालीन बाजारपेठ असून इतिहास कालीन महत्त्व आहेच, शिवाय जवळच शिव कालीन पुल, राज मार्ग, मेटपार मधून कोकण दर्शन असं मुळातच गावाचं वैशिष्टय असून, गावात शिव कालीन श्रीरामवरदानी चे भव्य असे मंदिर आहे, याचं पारपार ग्रामपंचायतिने गुलाबांचे गांव होण्याचा व त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरु आहे.संपूर्ण गावात, गल्ली, बोळात व सर्वांचे घरा समोर गुलाबांची झाडं लावून त्याचं महत्त्व, फायदे याबाबतीत देखील जन जागृती व तसेच पर्यटन वाढीस चालना असे सर्व उद्देश डोळ्या समोर ठेवून नुसते पारपार ग्रामपंचायत त्या दिशेने वाटचाल करत आहे.

गुलाबाचे महत्त्व लक्षात घेता गुलकंद, गुलाब अत्तर, गुलाब सिरपउत्पादक गावात निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर फुलेविक्री आणि त्या जोडीनेच प्रक्रिया उद्योगासाठीही फुलांची विक्री सुरू झाल्यास त्यांची ही गुलाबशेती वर्षभरासाठी गुलाबी बनेल. त्यामुळेच निश्चितच गावामध्ये रोजगार निर्माण होण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Post Views: 19 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य

Live Cricket