अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पर्यटन » महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारक कुटुंबीया समवेत दोन मे रोजी वेण्णा लेक येथे जलसमाधी घेणार -कुमार शिंदे

महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारक कुटुंबीया समवेत दोन मे रोजी वेण्णा लेक येथे जलसमाधी घेणार -कुमार शिंदे 

महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारक कुटुंबीया समवेत दोन मे रोजी वेण्णा लेक येथे जलसमाधी घेणार -कुमार शिंदे 

सातारा – महाबळेश्वर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे युवा नेतृत्व कुमार शिंदे यांनी स्थानिक आमदार आणि प्रशासन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.कुमार शिंदे म्हणाले महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमधील वेण्णा लेक परिसरातील २८ स्टॉल धारकावर अन्याय झाला असून त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर स्थानिक आमदार आणि प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. वेण्णा लेक परिसरातील आमच्या उपजीविकेचे साधन असणारे स्टॉल हे वन विभागाद्वारे अनाधिकाराने काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे २८ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

या मुळे वेण्णा लेक परिसरातील २८ स्टॉलधारक यांनी विषयांकीत रिट याचिका मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली होती. सदर याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक ११/०१/२०२४ रोजी मा.जिल्हाधिकारी सो. सातारा यांनी चार आठवड्याच्या आत निर्णय घेणेबाबत आदेश देण्यात आलेले होते.

परंतु सदर आदेश होऊन १५ महिने उलटून देखील अद्याप मा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचे द्वारे कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय घेणेकामी मा. जिल्हाधिकारी सो.सातारा यांचेकडे वारंवार पत्र व्यवहार केला असून देखील याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने वेण्णा लेक परिसरातील स्थानिक २८ स्टॉल धारक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असल्याने आम्ही वेण्णा लेक महाबळेश्वर येथील स्थानिक २८ स्टॉल धारक कुटुंबियांसमवेत दिनांक ०२/०५/२०२५ रोजी वेण्णा लेक महाबळेश्वर येथे जलसमाधी घेत आहोत. असे निवेदन प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती कुमार शिंदे पत्रकार परिषदेमध्ये दिली. दिनांक ०२/०५/२०२५ रोजी वेण्णा लेक महाबळेश्वर येथे जलसमाधी घेणेकामी प्रशासनामार्फत परवानगी देण्यात यावी. सदर पत्राबाबत दखल न घेतल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास, जीवित हानी झाल्यास त्यास संपूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची राहील. महाबळेश्वर स्थानिक वेण्णा लेक स्टॉल धारकानी हे निवेदन स्थानिक प्रशासन, जिल्ह्यातील मंत्री आणि मुख्यमंत्री यांनाही याबाबतची कल्पना दिली असल्याची स्टॉलधारकांनी माहिती दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket