Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर तालुक्यात तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर तालुक्यात तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर तालुक्यात तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर, दि. ६: महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद आणि नगरपरिषद शाळांमधील इयत्ता तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. गटविकास अधिकारी यशवंत भांड, सहा. गटविकास अधिकारी महादेव कांबळे आणि गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील १५ केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

महाबळेश्वर व पांचगणी शहरांसोबतच तालुक्यातील १२ केंद्रशाळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. तालुक्यातील १२० शाळांमधील इयत्ता तिसरीचे ५०३ विद्यार्थी आणि इयत्ता सहावीचे २९० विद्यार्थी अशा एकूण ७९३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, तसेच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी हा आहे. पंचायत समितीच्या सेस फंडातील तरतुदीतून शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर या प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विस्तार अधिकारी (सांख्यिकीय) विठ्ठल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी एन.के. धनावडे, केंद्रप्रमुख संजय पारठे, दगडू ढेबे, नामदेव धनावडे, विनायक पवार, चंद्रकांत जंगम, आनंद सपकाळ, तालुकासमन्वयक संतोष ढेबे, संतोष चोरगे आणि सर्व केंद्रसमन्वयक व केंद्रसंचालक यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे परीक्षा शांततामय आणि सुरळीत वातावरणात पार पडली.

विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दृष्ट्या जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी पंचायत समितीने घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत

Post Views: 38 वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत मुंबई, दि. ९ :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील

Live Cricket