अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये स्थलांतरित होणार

महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये स्थलांतरित होणार

महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये स्थलांतरित होणार

महाबळेश्वर : शहरातील एल. सी. डिसोजा रोडवर अनेक वर्षांपासून भरणारा ऐतिहासिक आठवडे बाजार आता पालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज पार्किंग परिसरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. या प्रस्तावित जागेची नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच स्थानिक नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक नियोजनाचा आढावा घेतला.

एल. सी. डिसोजा रोडवर आठवडे बाजार भरत असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नवीन ठिकाणी बाजार सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा ताण कमी होण्याबरोबरच बाजार अधिक नियोजनबद्ध पद्धतीने भरविणे शक्य होणार आहे.

पाहणीदरम्यान मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी संपूर्ण परिसराची तातडीने स्वच्छता करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच व्यापाऱ्यांसाठी शिस्तबद्ध गाळे, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यात पालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. जागेची स्वच्छता व प्राथमिक नियोजन पूर्ण झाल्यानंतर आठवडे बाजार नव्या ठिकाणी अधिकृतपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket