अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चिखली शाळेची स्वरा सुर्वे ‘नवोदय’साठी पात्र

महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चिखली शाळेची स्वरा सुर्वे ‘नवोदय’साठी पात्र

महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चिखली शाळेची स्वरा सुर्वे ‘नवोदय’साठी पात्र

महाबळेश्वर (प्रतिनिधी):दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले, तर आकाशही ठेंगणे पडते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील विद्यार्थिनी स्वरा मंगेश सुर्वे हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. स्वराची सातारा येथील खावली नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालयाच्या निकालानुसार, स्वराने ९७.५०% गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. महाबळेश्वर तालुक्यातून तिने मिळवलेले हे यश लक्षवेधी ठरले आहे. विशेष म्हणजे, स्वराने यापूर्वी देखील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपले प्राविण्य सिद्ध केले असून, तिची ही प्रगती सातत्यपूर्ण राहिली आहे.

 स्वराच्या या यशामागे तिचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तिला शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे, उपशिक्षक महेश पवार व सचिन जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच तिचे वडील मंगेश सुर्वे व पालकांनी तिच्या अभ्यासासाठी घेतलेली मेहनत फळाला आली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकूनही योग्य नियोजनाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील विद्यालयात प्रवेश मिळवता येतो, हे स्वराने दाखवून दिले आहे.

स्वराच्या या यशाबद्दल महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लता जाधव, उपाध्यक्ष संतोष मोरे, संपत जाधव, संतोष जाधव, विशाल पवार आणि चिखली ग्रामस्थ मंडळ व तालुक्यातील शिक्षक वृंद यांनी स्वराचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket