महाबळेश्वर तालुक्यात १८५० कोटींची विकासकामे-आ.मकरंद पाटील
महाबळेश्वर शहरासाठी १०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी.
क्षेत्र महाबळेश्वर साठी १९७ कोटींचा आराखडा मंजूर
अतिवृष्टी नंतर महाबळेश्वर तालुक्यात तब्बल ४०० पुलांची निर्मिती…
सातारा-मागील पाच वर्षात पर्यटनाच्या दृष्टीकोनातून महाबळेश्वर तालुक्यात तब्बल १८५० कोटींची विकासकामे केलेली असून महाबळेश्वर शहराच्या विकास आराखड्यासाठी १०० कोटींची मंजुरी घेण्यात आल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
आ.मकरंद पाटील यांच्या ऐतिहासिक प्रचाराच्या रॅली नंतर झालेल्या भव्य सभेत आ.मकरंद पाटील बोलत होते.
या प्रसंगी राजेंद्र राजपूरे,बाबुराव सपकाळ,बबन ढेबे,किसन शिंदे,उषा ओंबळे,विशाल तोवणीवाल,अफजल सुतार,सुनील शिंदे,विजय नायडू,शरद बावळेकर,रवींद्र कुंभारदरे,दत्तात्रय वाडकर,रोहित ढेबे,तौफिक पटवेकर,महेश कोमटी,संजय ओंबळे,विमल पार्टे,विमल ओंबळे,संजय पिसाळ,भक्ती जाधव,सुनील जंगम,गणेश जाधव,नारायण शिंदे,प्रकाश पाटील,गजानन काळे,सुरेश सावंत,संदीप साळुंखे,प्रवीण भिलारे ई.मान्यवर ,सर्व नगरसेवक,राष्ट्रवादी,भाजपा,शिवसेना,पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले की महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच येवढी भव्य रॅली मी पाहिली.या रॅली मध्ये सर्व समाजाच्या नागरिकांचा आणि राष्ट्रवादी,भाजपा, शिवसेने च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग पाहून आज माझा विजय निश्चित असल्याचा प्रत्यय आला.विकासकामे करताना तिथे मला मिळणारी मते किती आहेत याचा विचार मी कधीच केला नाही.महाबळेश्वर तालुक्याचे मतदान ५९००० आहे.तरीही या पाच वर्षात तिन्ही तालुक्यातील ४००० कोटींची विकासकामांपैकी फक्त महाबळेश्वर तालुक्यात तब्बल १८५० कोटींची कामे मी मंजूर करून आणली आणि या तालुक्याचा,मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला.महाबळेश्वर तालुक्यातील सर्वच मुस्लिम बंधू या आपल्या रॅलीमध्ये सहभागी झाले मला आनंद वाटल.या ऐतिहासिक रॅलीने खऱ्या अर्थाने या तालुक्यातील सामाजिक सलोख्याचे दर्शन झाले. महाबळेश्वर तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणजेच एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचा आपल्याला अभिमान आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर खूप चांगली पकड आहे.आणि अजितदादा म्हणजे शब्दाचा पक्का माणूस.दादा जे शब्द देतील जे बोलतात तेच करतात. आपल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लाडकी बहिण योजनेचे,एक लाख सात हजार भगिनींना प्रत्येकी साडेसात हजार रुपये दिल्याने महिलांना आर्थिक हातभार लावण्याचे काम आम्ही केले आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफी,मोफत तीन गॅस सिलेंडरचा निर्णय,वयश्री सन्मान योजना सन्मान योजनेने या सरकारने प्रत्त्येक घरघरातील व्यक्तीला हातभार लावलेला आहे.प्रत्त्येक समाजाकरिता महामंडळाची निर्मिती केली असून,मुस्लिम समाजासाठी सुध्दा महामंडळाची निर्मिती केलेली असून त्या महामंडळा द्वारे समाजातील युवकांना आर्थिक हातभार लावण्याचे काम सरकार करीत आहे.
मागील पाच वर्षात महाबळेश्वर तालुक्यासाठी तब्बल १८५० कोटींची विकासकामे केलेली असून पर्यटनाच्या दृष्टीने एकट्या महाबळेश्वर शहरासाठी १०० कोटीच्या आराखड्याची मंजुरी मिळवली आहे.सूरुर ते वाडा कुंभरोशी रस्त्यासाठी 275 कोटी मंजूर करून घेतले आहेत.महाबळेश्वर शहरातील पार्किंगची अडचण दूर व्हावी म्हणून पार्किंग करिता १५ कोटी रुपये मंजूर करून आणले असून वेण्णा लेक परिसर विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. ज्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमा चा साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या विकासासाठी तब्बल 121 कोटी रुपये मंजुरी मिळविलेली आहे.
पर्यटनाला चालना देणाऱ्या तापोळा पुलासाठी तब्बल १७५ कोटींचा निधी मंजूर करून आणला असून या पुलाचे काम ही सुरू झाले आहे.महाबळेश्वर मधील प्रशासकीय इमारतीसाठी १९ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.मुनवळे येथे वॉटर स्पोर्ट साठी तब्बल ५० कोटी रुपयांची मंजुरी मिळवली आहे.
त्याचबरोबर एसटी डेपोला सुद्धा आपण पार्किंग ची सोय करणार आहोत.सगळी प्रशासकीय कार्यालय आपण एका छाताखाली आणणार असून ग्रामीण भागामधला येणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही काम एकाच ठिकाणी, एकाच जागेवर मार्गी लागावं यासाठी आपण या भव्य प्रशासकीय इमारतींची निर्मिती करणार आहोत.महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली.कित्तेक पूल वाहून गेले,घरे वाहून गेली,गावांचा संपर्क तुटला म्हणून तर अवघ्या दोन वर्षात एकट्या महाबळेश्वर तालुक्यात तब्बल 400 छोटे-मोठे पूल बांधले.कोरोना काळात एकमेव माझ्याकडे ड्रायव्हर नसतानाही मी तिन्ही तालुक्यातील प्रत्त्येक गावात जात होतो.त्यावेळी ऑक्सीजान निर्मिती केली.लोकांना दिलासा दिला.खाजगी हॉस्पिटलची निर्मिती केली.रुग्णांना मोफत उपचार दिले.
पण आता ८ दिवसापूर्वी ज्यांची तुमची ओळख झाली ते माझी मापे काढायला लागली आहेत.जे कारखाने कर्जबाजारी झाले.लिलावाच्या रोज नोटिसा येत होत्या ते कारखाने माझे सगळे राजकारण पणाला लाऊन ताब्यात घेतले. कोणतीही बँक या कारखान्यांना कर्ज देत न्हवती.ते कारखाने मी चालू केले.सरकार कडून याच कारखान्यासाठी ४७६ कोटी रुपये घेऊन कारखान्याच्या १२८०० शेतकऱ्यांना २०२०,२१ ची थकबाकी जी रक्कम मी देणे लागत न्हवतो ते ५४ कोटी दिले.४६७ कोटी आणून कारखान्यांचा जप्तीच्या फास मी सोडवला आहे.बावधन ची सुत गिरणी बंद पडली होती.मी लक्ष घातलं.२०० कामगारांचे संसार माझ्या प्रयत्नाने चालले आहेत.मी हात काढून घेतला असता तर ती सूतगिरणी बंद पडली असती.
राजू शेठ राजपूरे म्हणाले की विरोधी पक्षाला उमेदवारी करायची असेल तर किमान पाच वर्ष ते भावना मांडत असतात पण इथे आठ दिवसात यायचं आणि टीका करायची हे योग्य नाही.८ दिवसात येऊन उमेदवारी करणं सोप्प नाही.ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या मतदाना मध्ये ९० टक्के मतदान आबांना होणारे.मागील १५ वर्षात मकरंद आबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न सोडविले आहेत.आज झालेली महाबळेश्वर शहरातील रॅली आजपर्यंत च्या इतिहासातील सर्वात मोठी रॅली आहे.या निवडणुकीत होणाऱ्या मतदानामध्ये महाबळेश्वर तालुक्यात २५००० मताधिक्य असणार.आबांच्याकडे निधी खेचून आणण्याची क्षमता आहे.सर्व पक्ष एका दिलाने काम करतायत.आबा निवडून येणार,महायुती ची सत्ता येणार ..आणि आबा मंत्री होणार.तुम्ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडा.आम्ही सक्षम आहोत.महिला सक्षम आहेत.सातारा जिल्ह्यामध्ये एकमेक मतदार संघ असा आहे की ज्यामधे अनेक गावे १०० टक्के मतदान आबांना करणार आहेत.अतिवृष्टी मुळे नुकसान झालेला महाबळेश्वर तालुका उभारण्याचे काम खऱ्या अर्थाने आबांनी केला.
शिवसेनेचे महाबळेश्वर शहर अध्यक्ष विजुभाऊ नायडू
म्हणाले की मकरंद आबांनी मागील १५ वर्षात महाबळेश्वर शहरासाठी विकासाची गंगा आणली.आबा १०० टक्के विजयी होणार आणि याच ठिकाणी विजयी सभा होणार.
भारतीय जनता पक्षाचे रवींद्र कुंभारदरे म्हणाले की कोणत्याही प्रश्नासाठी सतत उपलब्ध असणारा नेता म्हणजे आपले मकरंद आबा.
महाबळेश्र्वर अर्बन बँकेचे चेअरमन समीर भाई सुतार म्हणाले की मकरंद पाटील यांना महाबळेश्वर तालुक्यातून सर्वात जास्त मतांची आघाडी मिळेल.
शिवसेना चे धोंडिबा धनावडे म्हणाले की २४ तास ३६५ दिवस संपर्कात राहून सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे नेते म्हणजे मकरंद पाटील.
प्रास्ताविक विशाल तोषणीवाल म्हणाले की मकरंद आबा २४ तास सर्वांसाठी उपलब्ध असणारी व्यक्ती.कोरोणा काळात आबा २४ तास फिरत होते.अतिवृष्टी काळात महाबळेश्वर परिसरात मकरंद आबा देवदूत म्हणून उभे होते.
या सभेसाठी संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित होते.