लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम
Home » राज्य » शेत शिवार » सातारा जिल्ह्याला मान्सूनचा दिलासा; कोयना धरण क्षेत्रासह महाबळेश्वर, साताऱ्यात हलक्या सरी

सातारा जिल्ह्याला मान्सूनचा दिलासा; कोयना धरण क्षेत्रासह महाबळेश्वर, साताऱ्यात हलक्या सरी

सातारा जिल्ह्याला मान्सूनचा दिलासा; कोयना धरण क्षेत्रासह महाबळेश्वर, साताऱ्यात हलक्या सरी

सातारा  प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून लांबलेल्या मान्सून पावसामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत असताना सोमवारी जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने हजेरी लावून दिलासा दिला. कोयना धरण क्षेत्र, महाबळेश्वर तसेच सातारा शहर आणि परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विशेषतः शेतीच्या कामांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची नोंद होत असून, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाबळेश्वर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता. सातारा शहरातही अधूनमधून हलक्या सरी कोसळल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

दरम्यान, हवामानातील बदल लक्षात घेता येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket