अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीत मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम उत्साहात; १० प्रभागांत पार पडल्या ‘वॉर्ड सभा’

महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीत मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम उत्साहात; १० प्रभागांत पार पडल्या ‘वॉर्ड सभा’

महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीत मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम उत्साहात; १० प्रभागांत पार पडल्या ‘वॉर्ड सभा’

​महाबळेश्वर –माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमध्ये ‘मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ (SIR) अत्यंत पारदर्शक वातावरणात राबविला जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील दुबार, मयत, गैरहजर आणि स्थलांतरित (ASD) मतदारांची अचूक पडताळणी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

​या संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी सातारा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांच्या २४ जुलै २०२६ रोजीच्या आदेशानुसार, पालिका हद्दीतील संभाव्य याद्यांचे वाचन करण्यासाठी विशेष वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले होते.

​१० प्रभागांमधील १६ भाग याद्यांचे वाचन पूर्ण

​जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या एकूण १० प्रभागांमध्ये दिनांक २८ जुलै २०२६ आणि २९ जुलै २०२६ रोजी वॉर्ड सभांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभांमध्ये केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) तयार केलेल्या नगरपरिषद हद्दीतील एकूण १६ भाग याद्यांमधील गैरहजर, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांच्या संभाव्य याद्यांचे जाहीर वाचन केले.

सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थिती

​या वॉर्ड सभांच्या आयोजनात सर्वच स्तरांतून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक प्रभागातील स्थानिक नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी (BLA) आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष याद्यांचे वाचन झाल्यामुळे मतदार यादीच्या शुद्धीकरणाला मोठी गती मिळाली आहे.

​प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे विशेष योगदान

​सदर मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी:

​▪️लोकप्रतिनिधींचे सहकार्य: नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष श्री. नासिर मुलाणी, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले.

▪️​प्रशासकीय कामगिरी: नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्री. ज्ञानेश्वर मोहिते, श्री. मंगेश माने, सहायक पर्यवेक्षक आणि सर्व केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांनी अत्यंत महत्त्वाची आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली.

​या पुनरीक्षण कार्यक्रमामुळे महाबळेश्वर नगरपरिषद क्षेत्रातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket