शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर येथे वनविभागाच्यावतीने ”प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर अभियान”उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची संकल्पना ; वनविभागाचा ”प्लास्टिक मुक्ती”साठी पुढाकार

महाबळेश्वर येथे वनविभागाच्यावतीने ”प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर अभियान”उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची संकल्पना ; वनविभागाचा ”प्लास्टिक मुक्ती”साठी पुढाकार

महाबळेश्वर येथे वनविभागाच्यावतीने ”प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर अभियान”उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची संकल्पना ; वनविभागाचा ”प्लास्टिक मुक्ती”साठी पुढाकार

महाबळेश्वर( प्रतिनिधी) महाबळेश्वर दि ०४-०५ महाबळेश्वर व परिसरातील वनविभागाच्या वतीने ‘जैवविविधता व पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर अभियान’ सक्रियपणे राबविले जाणार आहे.शहर व परिसरातील सर्वच प्रेक्षणीय स्थळावर प्लास्टिकच्या बॉटल ऐवजी काचेच्या बाटल्यांचा वापर वाढावा या साठी वनविभागाच्यावतीने देखील पुढील काही दिवसात कठोर पावले उचलण्यात येणार आहे त्यामुळे स्थानिक स्टॉलधारक,व्यावसायिकांनी देखील या अभियानामध्ये सहभागी होत ”सिंगल युज प्लास्टिक”चा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर सहा. वन संरक्षक प्रदीप रौंदळ,गटविकास अधिकारी विजय विभुते,पो नी बापूसाहेब सांडभोर,वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते वन मंडळ अधिकारी सुनील लांडगे माजी नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर आदींसह हिलदारीचे सदस्य,वनरक्षक,सफाई कर्मचारी वेण्णा लेक स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर वेण्णालेक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

०५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सातारा वनविभागाच्यावतीने साताराचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून ”प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर” या अभिनव अभियानाची सुरुवात छ प्रतापसिंह उद्यान येथे आयोजित कार्यक्रमामधून करण्यात आले.यावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते हे बोलत होते त्यांनी पुढे बोलताना,देशात अनेक गिरिस्थाने,हिलस्टेशनस आहेत मात्र महाबळेश्वर गिरिस्थान हे आपलॆ वेगळेपण टिकवून असल्यामुळे पर्यटकांच्या पसंतीस पडते शंभू महादेवाचे स्थान,पाच नद्यांचे उगमस्थान असलेले व राजमाता जिजाऊची सुवर्णतुला झालेली ही पवित्र भूमी तसेच ऐतिहासिक,पौराणिक वारसा लाभलेल्या या महाबळेश्वरला दोन त्रितीयांश जंगलाचे क्षेत्र आहे येथील जंगले समृद्ध असून अनेकप्रकरची वृक्षसंपदा,प्राणी संपदा येथे आहे हे निसर्गवैभव टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे मात्र महाबळेश्वर व परिसर हा प्लास्टिकचा भस्मासुराने वेढला गेला असून भविष्य काळात फार मोठे संकट आपल्यावर येण्याची शक्यता आहे केवळ पर्यावरणावरचे हे संकट नसून मानवी आरोग्यावरचे देखील फार मोठे संकट आहे जंगलात सर्वत्र प्लास्टिक पसरल्यामुळे वन्यजीव व परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले त्यामुळे ”प्लास्टिक” चा वापर टाळण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर हे अभियान राबविण्याचा संकल्प केला असल्याचे अमोल सातपुते यांनी सांगून व्यापारी व्यवसायिकांसह सर्वानीच प्लास्टिक मुक्तीसाठी वनविभागास सहकार्य करून ”नो प्लास्टिक”चा आग्रह धरावा पुढील काळात वनविभाग सक्रियपणे हे अभियान राबवणार असल्याचे नमूद करून केवळ अभियान न राहता ही एक व्यापक अशी सामाजिक चळवळ बनायला हवी असे प्रतिपादन केले.

                 प्रारंभी वन परिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकात या अभियानाचा उद्देश विशद केला त्यानंतर गटविकास अधिकारी विजय विभुते पो नी बापूसाहेब सांडभोर यांनी वनविभागाच्या या अभियानाचे कौतुक केले स्वच्छ सुंदर महाबळेश्वर साठी आमचे सहकार्य निश्चित असल्याचे नमूद केले सहा. वन संरक्षक प्रदीप रौंदळ यांनी बोलताना,महाबळेश्वरचे नंदनवन अबाधित ठेवण्यासाठी ”प्लास्टिक मुक्ती”ची चळवळ सक्रियपणे राबविण्याची गरज आहे यासाठी प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेच्या बॉटल्सचा वापर वाढविण्यासह कोल्ड ड्रिंकच्या देखील प्लास्टिक बॉटल्स ऐवजी कॅन्स चा वापर वाढविण्यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले महाबळेश्वर पाचगणी पालिकांसह सवच विभागांनी या प्लास्टिक मुक्त अभियानात सहभागी होण्याचे आवाहन रौंदळ यांनी केले वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांनी आभार मानले.

              वेण्णालेक स्टॉल मागील बाजूस असलेल्या वनविभागाच्या वाहनतळामधून उपवनसंरक्षक अमोल सातपुते,सहा. वन संरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते वन मंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेस हिलदारी सह वनविभागाचे वनरक्षक स्वच्छता कर्मचारीसह वेण्णालेक येथील स्टॉलधारक सहभागी झाले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket