टाटा ग्रुपचे माधवराव जोशी रविवारी साताऱ्यात रतन टाटा यांच्या विषयावर साधणार संवाद
सातारा- टाटा टेली सर्विसेसचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे कायदेशीर सल्लागार माधवराव जोशी हे एक दिवसाच्या सातारा भेटीवर रविवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी येत आहेत. आम्ही पुस्तक प्रेमी समूह सातारा, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय सातारा यांचे संयुक्त विद्यमाने नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माधवराव जोशी हे सातारकरांशी संवाद साधणार आहेत.त्यांच्या व्याख्यानाचा विषय टाटा उद्योग विश्व आणि रतन टाटा हा असून भाषणानंतर नंतर प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, श्रीराम नानल, अजित कुबेर आणि वैदेही कुलकर्णी यांनी केले आहे.
माधवराव जोशी गेल्या ५० वर्षांपासून कॉर्पोरेट क्षेत्रात अत्यंत वरिष्ठ पदांवर कार्यरत असून टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेडचे कायदेशीर सल्लागार आहेत. १४ वर्षे टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेडचे प्रेसिडेंट आणि त्याआधी ५ वर्षे बायर इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालक आणि १३ वर्षे विंडसर मशीन्समध्ये सीएफओ,कंपनी सेक्रेटरी आणि कायदा विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पहिले आहे
माझी कॉर्पोरेट दिंडी हे आत्मचरित्रपर पुस्तक त्यांनी मराठीत मे २०२२ मध्ये लिहिले. आतापर्यंत त्याच्या तीन आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत एप्रिल २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या माय कॉर्पोरेट ओडिसी या इंग्रजी पुस्तकाला आणि जानेवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘टाटा एक विश्वास ‘ या पुस्तकाला श्री रतन टाटा यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
