अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » साताऱ्यात गुरुवारी साहित्यिक आनंद मेळा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि आदिश जैन फाउंडेशनतर्फे आयोजन

साताऱ्यात गुरुवारी साहित्यिक आनंद मेळा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि आदिश जैन फाउंडेशनतर्फे आयोजन

साताऱ्यात गुरुवारी साहित्यिक आनंद मेळा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि आदिश जैन फाउंडेशनतर्फे आयोजन

सातारा- येथील लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था,आदिश जैन फाउंडेशन आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्यातर्फे गुरुवार दिनांक 25 जून रोजी लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी कोडोली येथे साहित्यिक आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा एकूण चार सत्रामध्ये चालणार असून सकाळी साडेअकरा ते साडेबारा या पहिल्या सत्रामध्ये कथाकथन होणार असून त्याचे गटप्रमुख डॉक्टर दिलीप गरुड आहेत. यावेळी आशा ठिपसे,नंदा देवडीकर, शुभदा उदगावकर, पल्लवी पाठक कथाकथन सादर करतील. दुसरे सत्र दुपारी बारा ते एक या कालावधीमध्ये असून यावेळी काव्यवाचन होणार आहे .या कार्यक्रमाचे गटप्रमुख सुरेश शेठ असणार असून अंजली डोळे, नीता तुपारे,सुजाता पवार, अंजली महाजन कविता सादर करतील.

या दोन्ही सत्रांचे उद्घाटक जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके असणार आहेत, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक श्रीराम नानल असतील. तिसरे सत्र दुपारी दोन ते दोन चाळीस या कालावधीमध्ये होणार असून त्यावेळी आपले कुटुंब या विषयावर चर्चा होणार आहे .या कार्यक्रमाचे गटप्रमुख म भा चव्हाण असणार असून यावेळी नीलिमा फाटक, मृणाल जैन, आपले विचार मांडतील .चौथे सत्र दुपारी 2 40 ते 3:30 या कालावधीत होणार असून त्याचा विषय स्वच्छता, वैयक्तिक व सामाजिक हा आहे.हा कार्यक्रम प्रश्नोत्तरे स्वरूपात असून डॉक्टर मृदुला खैरनार कुलकर्णी उत्तरे देतील.

या कार्यक्रमाच्या गटप्रमुख राजश्री सोले असणार असून यावेळी पुष्पा कुलकर्णी वंदना घाणेकर, वंदना ललवाणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक कुपर उद्योग समूहाचे नितीन देशपांडे असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर संदीप श्रोत्री असतील. सर्वांनी या साहित्यिक मेळा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरिष चिटणीस, सचिव शिल्पा चिटणीस आणि लोकमंगल हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय यादव यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket