महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » देश » स्व.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

स्व.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

स्व.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

सातारा : जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक पाऊल उचलत दिनाक २२ सप्टेंबर २०२५ पासून विनामूल्य किमोथेरपी सेवा (डे केअर किमोथेरपी सेंटर) सुरू करण्यात आली आहे. ही सेवा जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या नेतृत्वाखाली व प्रभावी नियोजनातून ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या किमोथेरपी युनिटमुळे आता कर्करोग रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये होणारा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे

ही सेवा दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप वाठारे (ओरल कॅन्सर सर्जन) हे रुग्णालयात उपस्थित राहून मुख कर्करोग संशयित तसेच निदान निश्चित झालेल्या रुग्णाची तपासणी करून पुढील उपचार, संदर्भसेवा व मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे विशेषता मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग रुग्णाना त्वरित व शास्त्रशुद्ध उपचारांची सुविधा उपलब्ध होत आहे.

तरी नागरिकांना कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास अथवा निदान निश्चित झाल्यास विलंब न करता स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय येथील एनसीडी विभाग (ओपीडी क्रमांक १७) येथे संपर्क साधून मोफत कर्करोग तपासणी व किमोथेरपी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket