अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » कुसुंबी गटात शिवसेनेचा प्रचार दौरा; गावोगावी मतदारांशी संवाद

कुसुंबी गटात शिवसेनेचा प्रचार दौरा; गावोगावी मतदारांशी संवाद

कुसुंबी गटात शिवसेनेचा प्रचार दौरा; गावोगावी मतदारांशी संवाद

मेढा प्रतिनिधी- शिवसेनेचे  80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण हे धोरण आहे . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील बोंडारवाडी धरणासह , पर्यटन , कृषी व्यवसाय , महिला गृहउद्योग याला चालना देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार आहे . त्यामुळे जनता नक्कीच माझ्या सारख्या समाजसेवकाच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केला .

कुसुंबी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार कविताताई ओंबळे यांच्या प्रचारार्थ  केळघर परिसरातील कुरुळोशी , गाढवली , आंबेघर , डांगरेघर , पुनवडी , नांदगणे , वरोशी , बोंडारवाडी , भुतेघर , वाहिटे , बाहुळे , वाळंजवाडी , तळोशी , मुकवली , वाटंबे , गवडी , आसनी , ओखवडी , भोगवली आदि गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला . यावेळी ते बोलत होते .यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सचिन शेलार, युवासेनेचे तालुका प्रमुख प्रसाद धनावडे , प्रशांत जुनघरे ,  विठ्ठल पाटणे , महादेव ओंबळे , बाळासाहेब ओंबळे , दिपक ओंबळे , वनिता ओंबळे , राजाराम जाधव आदि उपस्थित होते .

यावेळी कविताताई ओंबळे म्हणाल्या , ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे . शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ ओंबळे हे कोणताही पक्ष न बघता केवळ समाज हितासाठी काम करत आले आहेत . त्यामुळे जनता नक्कीच शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी राहिल . यावेळी  गावा -गावातील मतदारांशी संपर्क साधत पक्षाची भूमिका समजावून सांगत धनुष्य बाणाला मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले .

 

   

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket