सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, दहा जणांचा मृत्यू, अमृतत्स्नान रद्द

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, दहा जणांचा मृत्यू, अमृतत्स्नान रद्द 

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, दहा जणांचा मृत्यू, अमृतत्स्नान रद्द 

प्रयागराज – उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामळं आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर मौनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या अमृत स्नानाचा निर्णय रद्द केला आहे. आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही. आखाड्यांनी त्यांच्या मिरवणुकांना शिबिरांना माघारी बोलावण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती महंत रवींद्र पुरी यांनी दिली.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरी झाली. रात्री 1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं. 

रुग्णवाहिका चालकांनी चेंगराचेंगरी झाली झाल्याची माहिती आहे. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते. त्यामुळं एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर पळापळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार 111 ते 122 पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. 

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सातत्यानं जिथं चेंगराचेंगरी झाली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं आवाहन केलं आहे संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket