Home » देश » नाकर्त्या उमेदवारांना महाबळेश्वरचे मतदार खड्यासारखे बाजूला ठेवतील कुमारभाऊ शिंदे यांचा विश्वास

नाकर्त्या उमेदवारांना महाबळेश्वरचे मतदार खड्यासारखे बाजूला ठेवतील कुमारभाऊ शिंदे यांचा विश्वास

नाकर्त्या उमेदवारांना महाबळेश्वरचे मतदार खड्यासारखे बाजूला ठेवतील कुमारभाऊ शिंदे यांचा विश्वास

महाबळेश्वर (प्रतिनिधी) : तब्बल दीड वर्षे काही मंडळी पालिकेच्या सभांना दांडी मारून घरात बसली होती. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हांला निवडून दिले होते. लोकप्रतिनिधी म्हणून आपले मूळ कर्तव्य विसरलेल्या या नाकर्त्या उमेदवारांना महाबळेश्वरचे मतदार खड्यासारखे वेचून बाजूला ठेवतील. आणि उद्याच्या २० तारखेला कामाच्या लोकप्रतिनिधींची मतदानातून पाठराखण करतील, असा विश्वास महाबळेश्वर गिरिस्थान नगर विकास आघाडीचे (नियोजित) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला. 

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणूक प्रचारात कुमारभाऊ शिंदे व त्यांच्या नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. या प्रचारात ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधताना कुमारभाऊ शिंदे बोलत होते. 

विरोधकांच्या कार्यपद्धतीवर शाब्दिक प्रहार करताना कुमारभाऊ शिंदे पुढे म्हणाले, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना येण्याचे विरोधी सदस्यांनी टाळले. तब्बल दीड वर्ष हे सदस्य पालिकेत सभांना गैरहजर राहिले, सभांना गेलेच नाहीत. जनतेने त्यांचे प्रतिनिधी म्हणून विरोधकांना निवडून दिले. जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठवले. या विरोधी सदस्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याचा विसर पडला. जनतेला वेठीस धरण्याचे काम गत पंचवार्षिक मध्ये विरोधकांनी केले. अशांना महाबळेश्वरचे मतदार कदापि विसरणार नाहीत. एकदा झालेली चूक उद्याच्या नगरपालिका निवडणुकीत दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. महाबळेश्वरच्या विकासात अडसर ठरणाऱ्या प्रवृत्तींना मतदार राजा खड्यासारखे बाजूला काढेल, असा विश्वासही कुमारभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला. 

घरात बसून दुसऱ्यांवर टीका करणारा नव्हे तर तुमचे प्रश्न सभागृहात मांडणारा, आवाज उठवून मार्गी लावणारा, मंत्रालयाचे, सचिवलयाचे दरवाजे ठोठावून महाबळेश्वरच्या विकासासाठी निधी खेचून आणणारा प्रतिनिधी महाबळेश्वरचे मतदार निवडून देतील. महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे, हे येथे जनता जनते. यापुढेही ठोस कार्यक्रम घेऊन येणार्‍या काळात महाबळेश्वरचा खुंटलेला विकास नक्कीच करून दाखवू, असा विश्वास कुमार शिंदे यांनी व्यक्त केला. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 11 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket