नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » खंडाळा पोलिसांच्या दूरदृष्टीने खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात वाकड पोलिसांना यश

खंडाळा पोलिसांच्या दूरदृष्टीने खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात वाकड पोलिसांना यश

खंडाळा पोलिसांच्या दूरदृष्टीने खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात वाकड पोलिसांना यश.

खंडाळा : खंडाळा घाटात टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती . वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड , पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी मधील महिला जयश्री मोरे हीचा असल्याचे समजल्यानंतर गुन्हा अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग करणेत आला आहे. तद्नंतर १२ तासांच्या आतच सदर खुनाचा गुन्हा उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , वाकड येथे सोमवारी , दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. जयश्री विनय मोरे (२७, रा. मारुंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून दिनेश पोपट ठोंबरे (३२, रा. बहुर, पो. करुंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मयत जयश्री मोरे पतीपासून विभक्त राहत होती.दिनेश ठोंबरे हा हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायजर असून त्याचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दिनेश हा सोशल मीडियावर ॲक्टिव असायचा. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. गेल्या चार वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लिव्ह इन रिलेशन मध्ये असताना त्यांना तीन वर्षांचा मुलगा असल्याचे समजते. जयश्री आणि दिनेश यांचे काही दिवसांपासून विविध कारणांवरून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत वेगळे राहायचे म्हणत होती. रविवारी दिनांक २४ नोव्हेंबर रोजी दोघेही पुणे येथील भूमकर चौक येथे गाडीत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत ठेवलेल्या हातोड्याने जयश्रीच्या डोक्यात वर्मी घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा मृत्यू झाला.त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात जयश्रीचा मृतदेह फेकला. त्यानंतर दिनेश पिंपरी- चिंचवडमध्ये परतला. सोमवारी दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दिनेश ठोंबरे याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दिली.

खंडाळा पोलिसांच्या दूरदृष्टीने पटली मृतदेहाची ओळख…लागला गुन्ह्याचा छडा.

खंडाळा घाटामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह दिसून येत असल्याबाबत एका प्रवास्याने पोलीस कंट्रोल ला ११२ नंबरला कॉल करून सांगितले . त्यानंतर खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात धाव घेत पोलीस कर्मचारी व खंडाळा तालुका रेस्क्यु टीम च्या साह्याने मृतदेह वर काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांचे आदेशान्वये पोलीस उप अधीक्षक राहुल धस , स्था.गु.शा.पोलीस निरीक्षक अरुण देवकर , खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके , स.पो. नि.संतोष म्हस्के , पो. ह.संजय जाधव , संजय पोळ, शरद तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, अमित चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवत मिसींग व्यक्तींबद्दल ऑनलाईन तपासणी केली असता मिळते जुळते वर्णनाची महिला वाकड येथून बेपत्ता असलेबाबत माहिती मिळाली.दरम्यान, जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वाकड पोलिसांना दिली असता खंडाळा पोलीस व पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असता यामागे दिनेश ठोंबरेच असल्याचे पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर समोर आले. बनाव करण्यासाठी दिनेश याने जयश्रीचे तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिलेचे निदर्शनास आले. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील व्हायरल केली होती ज्यानंतर लहान मुलगा आळंदी पोलिसांना मिळून आला होता . खंडाळा पोलिसांचे सहकार्याने वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या १२ तासांत गुन्ह्याची उकल करून या प्रकरणी दिनेश याला अटक केली. 

सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, पोलिस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही पुढील कारवाई यशस्वी केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket