Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कु.श्रेयस जाधवने पटकावली सक्सेस अबॅकसची एक लाख रुपयांची स्कॉलरशिप

कु.श्रेयस जाधवने पटकावली सक्सेस अबॅकसची एक लाख रुपयांची स्कॉलरशिप

कु.श्रेयस जाधवने पटकावली सक्सेस अबॅकसची एक लाख रुपयांची स्कॉलरशिप

सातारा -अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे सक्सेस अबॅकस नॅशनल लेवल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.सातारा येथे सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भव्य नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन –बक्षीस वितरण समारंभ २०२५ उत्साहात संपन्न.

गणित म्हणजे भीती नव्हे तर आत्मविश्वासाची ताकद आहे हेच या कार्यक्रमांमधून अधोरेखित झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले. या सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे उपस्थित होते. त्यांच्या सोबत संस्थेचे सक्सेस अबॅकस चेअरमन किरण पाटील, संचालिका मीनाक्षी पाटील, अँड.धीरज घाडगे, मंगेश प्रधान, छाया देसाई, आदी मान्यवरांनी उपस्थित होते.

संस्थेच्या माध्यमातून दिली जाणारी  एक लाख रुपयांची स्कॉलरशिप श्रेयश दीपक जाधव याने तर स्पेशल बक्षीस लॅपटॉप  मयंक मदनराव कदम तसेच यावर्षी चे सायकल विनर अनुक्रमे स्वरा पाटील, हर्षल पाटील , स्वानंदी डफळ, राजनंदिनी शिंदे, आणि विहान डोंगरे, यांनी घवघवीत यश मिळवले.  

वेदिक मॅथ्स मध्ये प्रथम क्रमांक रु 10,000 चे पारितोषिक सार्थक हनुमंत खुसपे अवनीश द्वितीय क्रमांक रु 5000 चे पारितोषिक तर तृतीय क्रमांक रु 3000 पारितोषिक रिद्धी धमाल यांनी मिळवले.

लेव्हल ४ मधील एक लाख रुपये कॉलरशिप विजेत्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सुनीता अविनाश जाधव यांना ₹२५,०००/- धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी वैभवी मदणे तसेच अवघ्या १२ व्या वर्षी कळसुबाई, हरिश्चंद्रगड आणि युरोपमधील माउंट एलब्रूस शिखर सर करणारी कु. धैर्या विनोद कुलकर्णी हिचा विशेष सन्मान करण्यात आला.

साहित्य, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनी कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान‘सक्सेस दुर्गा सन्मान’ हा पुरस्कार देण्यात आला यामध्ये भारतीय रेल्वे मध्ये, पहील्या महिला लोकोपायलट मेल /एक्सप्रेस (चालक)सुरेखा यादव तसेच डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या सौ. सीमा राजेंद्र शिंदे अर्थात शिंदे मॅडम यांचा तसेच शीतल भोसले , डॉ. मेघा देशमुख सौ. सिद्धी रवींद्र पवार , सो.हेमलता सागर भोसले याच विशेष सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमांमध्ये सक्सेस अबॅकस चे चेअरमन श्री. किरण पाटील यांनी सीमाताई शिंदे यांची आणि अभिनेते श्रेयस तळपदे याची मुलाखत घेऊन त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतला. ही मुलाखत विद्यार्थी व पालक यांच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली. 

 फ्रँचायझी व प्रशिक्षकांचा गौरव

01 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्वाधिक प्रवेश नोंदवणाऱ्या टॉप 3 फ्रँचायझी धारकांचा पैठणी व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बेस्ट कोर्स इन्स्ट्रक्टर्स, आदी. फ्रेंचाईजी धारकांचा सन्मान करण्यात आला. हा भव्य सोहळा विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा आणि शिक्षण क्षेत्रात प्रेरणा देणारा ठरला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान 

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  सातारा जिल्ह्यातील कोडोली गावचे प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक

Live Cricket