क्रीडामहर्षी गुरुवर्य बबनराव उथळे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
राज्यभरातून शुभेच्छा वर्षाव, खेळाडूंच्या उपस्थितीने भारवले, जुन्या आठवणींना उजाळा
सातारा – सातारच्या भूमीचे क्रीडावैभव संपूर्ण देश पातळीवर उंचविणाऱ्या शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष क्रीडामहर्षी गुरुवर्य बबनराव उथळे (अण्णा) यांचा 98 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच त्यांच्या शनिवार पेठ येथील राहत्या घरी शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा व राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी फोन द्वारे व सक्षम भेटून शुभेच्छा दिल्या. सातारच्या क्रीडा क्षेत्रातील एक दीपस्तंभ म्हणून ओळखले जाणारे गुरुवर्य बबनराव उथळे वयाच्या 98 व्या वर्षीही सर्वांची आस्थेने विचारपूस करीत होते क्रीडाक्षेत्राशी निष्ठेने कार्य करणारे गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या त्यागीवृत्तीचे सर्वांनी यावेळी कौतुक केले.
प्रारंभी श्री शिवाजी उदय मंडळाच्या वतीने त्यांना सातारच्या प्रसिद्ध कंदी पेढ्याचा हार घालून 98 वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी संपूर्ण राज्यातून शिवाजी उदय मंडळाच्या आजी-माजी खेळाडूंची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती विशेषता माजी खेळाडूंच्या उपस्थितीने गुरुवर्य बबनराव उथळे भारवले व जुन्या क्रीडा क्षेत्रातील आठवणींना एक उजाळा दिला.
यावेळी बोलताना गुरुवर्य बबनराव उथळे म्हणाले की शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच संस्कारक्षम समाज निर्मितीचे ध्येय ठेवून शिवाजी उदय मंडळाची स्थापना करण्यात आली निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने क्रीडांगणाशी नाते जोडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आदर्श युगपुरुषाचे वैचारिक वारसा जतन व पालन करताना सर्व धर्मीयांचा स्वाभिमान जपणे ही शिवरायांची शिकवण प्रत्येकांच्या मनामनात रुजविण्यासाठी मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे सातारच्या क्रीडा वैभव उंचविण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, राजमाता सुमित्राराजे भोसले,निळूभाऊ लिमये,श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले ,विलास काका उंडाळकर, गुलाब भाई बागवान यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे गुरुवर्य बबनराव उथळे यांनी सांगितले.
चौकट – संपूर्ण देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सातारचे क्रीडावैभव उंचविण्यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर, विजय जाधव, कुमार कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय धावपटू सुलताना खान, उज्वल माने, सुभाष मेहंदळे, अमित नलावडे यांच्या क्रीडाखेळातील कौशल्य विषयाच्या आठवणींना गुरुवर्य बबनराव उथळे यांनी उजाळा दिला.
– गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवाजी उदय मंडळाच्या सभागृहात तीन दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते बालवयापासून विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा संस्कार संस्काराचे ओळख व त्यांना ओढ लागावी यासाठी आयोजन केले होते हे शिबिर विनामूल्य ठेवले होते या शिबिरास लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर मंडळाचे खजिनदार सुरेश पाटील नारायणदास दोषी गोपाळ माने अरविंद कुलकर्णी पांडुरंग महाडिक मोहन निकम मोहनराव नलावडे शशी यादव प्रसाद उथळे रघुनाथ राजमाने यांनी वाढदिवसाचे आयोजन केले होते-
