Post Views: 28
कोयना धरणा मधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ
कोयना प्रतिनिधी (धीरज कदम )-कोयना धरण आज दि. ३० जुलै २०२४ रोजी सकाळी ८:०० वा. धरणामध्ये एकूण ८५.३७ टीएमसी (८१.११%) पाणीसाठा झाला आहे.
सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दुपारी १२:०० वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.
धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक्स असेल.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.