Home » राज्य » शेत शिवार » कोयना धरण आज अखेर 82 टक्के भरले

कोयना धरण आज अखेर 82 टक्के भरले 

कोयना धरण आज अखेर 82 टक्के भरले 

कोयना धरणआज दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वा. धरणामध्ये एकूण ८६.१९ टीएमसी ८१.८४ % पाणीसाठा झाला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत सांडव्यावरून ४०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. उद्या दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ५०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२,१०० क्युसेक्स असेल.

कोयना/कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket