अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » किसन वीर’ च्या साई केंद्रात यावर्षीही होणार उन्हाळी कस्ती शिबीर २४ एप्रिलपर्यत इच्छकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

किसन वीर’ च्या साई केंद्रात यावर्षीही होणार उन्हाळी कस्ती शिबीर २४ एप्रिलपर्यत इच्छकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

किसन वीर’ च्या साई केंद्रात यावर्षीही होणार उन्हाळी कस्ती शिबीर २४ एप्रिलपर्यत इच्छकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा -किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सार्ड (स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ डंडिया) केंद्राच्यावतीने २५ एप्रिल ते १९ मेअखेर उन्हाळी निवासी शिबीर १० ते १७ वयोगटातील कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आयोजित केले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली. दरम्यान, या शिबीरात सहभागी होणाऱ्या मुलांनी २४ एप्रिलपर्यत कारखान्याच्या कुस्ती केंद्रात नोंदणी करावी. असे आवाहनही करण्यात आले आहे.

माहितीपत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी मागील तीन वर्षापासून उन्हाळी कुस्ती शिबीर नविन उमेदीने व नव्या स्वरूपात सुरू केलेले होते. मागील तीन वर्षीचा मिळालेला प्रतिसाद पाहता याही वर्षीं उन्हाळी कुस्ती शिबीर घेण्याचा निर्णय नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने घेतलेला आहे. या उन्हाळी शिबीरात सहभागी होणाऱ्या शिबीरार्थींस सात हजार पाचशे रूपये फी आकारण्यात येणार आहे. या फीमध्ये शिबीरार्थीसाठी निवास, भोजन, दुध, नाष्टा, फलाहार देण्यात येणार असून टी शर्ट, शॉर्ट व शुज हे प्रशिक्षणांती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी दोन आंतरराष्ट्रीय मॅटसह कुस्ती क्षेत्रातील तज्ञ, शासकीय कुस्ती मार्गदर्शक दत्ता माने हे मार्गदर्शन करणार असून योगाचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी शिबीरार्थीना ट्रॉफीजचे वाटप करण्यात येणार आहे. 

मर्यादित शंभर मुलांसाठी हे उन्हाळी शिबीर आयोजित केलेले असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. या उन्हाळी शिबीरामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी दैनंदिन वापराच्या वस्तु, बिछाना सोबत आणायचे असून अधिक माहितीसाठी कारखाना कृस्ती मार्गदर्शक राजेंद्र कणसे ( ९२७००७८५३४) यांच्याशी संपर्क साधावा आणि या उन्हाळी शिबीरचा लाभ घ्यावा, असे आवाहनही व्यवस्थापनाच्यावतीने व्हार्डस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket