किसन वीर व खंडाळा कारखान्याचा शनिवारी गळित हंगाम शुभारभ
सातारा -भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा तालुक्यातील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाचा सन २०२५-२६ च्या गळित हंगामाचा शभारंभ शनिवार (दि.२५) रोजी होणार आहे. खंडाळा कारखान्याचा सकाळी ९.३० वाजता तर किसन वीरचा सकाळी ११.३ ० वाजता राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा व कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, किसन वीर व किसन वीर-खंडाळा य दोन्ही कारखान्यावरील तोडणी यंत्रणा दोन्ही कारखान्यावर दाखल झालेली आहे. कारखान्यातील अंतर्गत कामे पर्ण झालेली असून दोन्ही कारखाने गाळपास सज्ज आहेत. शेतकऱ्यांचे ऊस तोडणी प्रोग्रॅमप्रमाणेच तूटणार असून सभासदांनीही क्षणिक मोहाला बळी न पडता आपल्या पिकविलेल संपुर्ण ऊस किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्यालाच गळितासाठी पाठविण्याचे आवाहन करून कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील व संचालक मंडळाच्यावतीने सर्वांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्याच्या गळित हंगाम शुभारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.




