Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » केळघर–शिर्डी साई पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन

केळघर–शिर्डी साई पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन

केळघर–शिर्डी साई पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन

केळघर प्रतिनिधी -येथील ओम साईनाथ मित्र मंडळ यांच्या वतीने केळघर ते क्षेत्र शिर्डी पालखीसह दिंडी सोहळ्याचे आयोजन मंगळवार (ता.३) ते शुक्रवार (ता:१३) अखेर करण्यात आले असल्याची माहिती ओम साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे व उपाध्यक्ष जगन्नाथ पार्टे यांनी दिली.

मंगळवारी (ता:३)रोजी साई मंदिर केळघर येथून साई पालखीसह दिंडी सोहळा चे प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्याचे मुक्काम कुडाळ, पिंपोडे बुद्रुक, गुळुंचे,सुपा ,नागरगाव, शिरूर, हंगा,राहुरी, कोल्हार येथे होणार आहेत. गुरुवार (ता:१२)ला खंडोबा मंदिर शिर्डी येथे दिंडी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम आहे. रविवारी (ता:१५ )केळघर येथे कै. अण्णा गणपत बेलोशे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय अण्णा बेलोशे व वाघ परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ओम साई नाथ मित्र मंडळ यांनी दिली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित-एकनाथदादा ओंबळे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता

Live Cricket