केबीपी मॅनेजमेंटमध्ये ईम्बार्क 2025 चे आयोजन
सातारा -कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये येथे दि १२ व १३ मार्च २०२५ रोजी अंतर महाविद्यालयीन स्पर्धा ‘ईम्बार्क२०२५’ आयोजित करण्यात आली आहे.आजच्या काळात नवीन कल्पना आणि संकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेऊन सदरची स्पर्धा २००५ पासून प्रत्येक वर्षी आयोजीत केली जाते. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतात.
यावर्षी १२ व १३ मार्च रोजी आयोजन करण्यात येते.या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. यामध्ये जाहिरात स्पर्धा, सर्वोत्कृष्ट कार्यकारी, पोस्टर प्रझटेंशन, नृत्य अविष्कार,मेहंदी, खजिना शोध स्पर्धा, रांगोळी, व्यवसाय कल्पना, बिझनेस प्ल्यान,चेहरा रंगकाम अशा कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस आणि सन्मानचिन्हाने सन्मानित केले जाईल तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.
सदर स्पर्धेचे समन्वयक डॉ. आर.डी.कुंभार, प्रियंका लोखंडे व प्रियंका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत इच्छुक पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या ओळखपत्रासह नांव नोंद करून सहभागी व्हावे असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक डाॅ बी एस सावंत यांनी केले आहे.
