अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » कशेडी घाट पुन्हा रक्तरंजित; डंपरखाली कार घुसून मुलाचा मृत्यू, आई गंभीर

कशेडी घाट पुन्हा रक्तरंजित; डंपरखाली कार घुसून मुलाचा मृत्यू, आई गंभीर

कशेडी घाट पुन्हा रक्तरंजित; डंपरखाली कार घुसून मुलाचा मृत्यू, आई गंभीर

अलिबाग :मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून सोमवारी (दि. ८ जून) दुपारी एकच्या सुमारास कशेडी घाटातील भोगाव हद्दीत भीषण अपघात घडला. भरधाव कार पुढे जात असलेल्या डंपरच्या मागील बाजूस घुसल्याने कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एमएच-०५-सीए-३३६७ क्रमांकाची कार चालक निकेश बालन याच्या ताब्यात होती. कशेडी घाटात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागावर आदळली. अपघातात निकेश बालन आणि त्यांची आई लीसी बालन (वय ६३, रा. कल्याण) गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार व अन्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान निकेश बालन यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या लीसी बालन यांना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते व लक्ष्मण कळंबे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार व डंपर रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket