Home » राज्य » पर्यटन » कारची टेस्ट ड्राईव्ह महागात, २० फूट खोल खड्ड्यात कार

कारची टेस्ट ड्राईव्ह महागात, २० फूट खोल खड्ड्यात कार

कारची टेस्ट ड्राईव्ह महागात, २० फूट खोल खड्ड्यात कार 

ठाणे :अपघात नेमका कसा आणि कधी होईल सांगता येत नाही. ठाण्यात एक भीषण अपघात झाला असून टेस्ट ड्राइव्हसाठी घेतलेली कार चक्क २० फूट खोल खड्ड्यामध्ये पडली. या घटनेत नव्या कोऱ्या टेस्ट ड्राइव्ह कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील महिले कंबरेला दुखापत झाली आहे. तसेच दोन दुचाकी आणि एका रिक्षाचेही नुकसान झाले आहे. या अपघातामुळे परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हा अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी देखील मोठ्याप्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही स्थानिक नागरिक अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले.

ठाण्यातील पाचपाखाडी भागात शो-रुममधील कार चाचणीसाठी नेली असता, वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार २० फूट खोल खड्ड्यात पडून तीन जण जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. या घटनेत कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून अपघातापूर्वी कारची तीन वाहनांना धडक बसली होती. त्यामुळे इतर वाहनांचेही या अपघातात नुकसान झाले आहे.

कुमारी प्रिया (३६), मिथिलेश पासवाण (४८) आणि चेतन देशमुख (३०) अशी जखमींची नावे आहेत. यातील कुमारी प्रिया यांना डोक्याला आणि कमरेला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याण येथे राहणारे मिथिलेश आणि कुमारी हे पाचपाखाडी येथील उत्सव हाॅटेल परिसरातील कार शो-रुममध्ये आले होते. कारची टेस्ट ड्राइव्ह कराची असल्याने मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास येथील एक कार चाचणीसाठी बाहेर काढण्यात आली होती.

शो-रुममधील कर्मचारी चेतन देशमुख हे देखील त्या कारमध्ये होते. ते कार चालवित होते. परंतु त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोन दुचाकी, एका रिक्षाला कारची धडक बसली. तसेच याच भागात एका इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे २० फुट खड्डा खणण्यात आला आहे. या खड्ड्यात जाऊन कार पडली. घटनेची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर काही नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले. या अपघातानंतर कारमधील एअर बॅग झाल्याने मिथिलेश आणि चेतन यांना किरकोळ दुखापत झाली. परंतु कुमारी यांच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाल्याने स्थानिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket