दारु पिण्यासाठी पैसे देत नसलेचे कारणावरुन आरोपीस ०१ वर्षे ०९ महिने साधा कारावास व रु. १२,०००/-दंडाची शिक्षा.
सातारा – दिनांक २१/१०/२०२२ रोजी रात्री ११.०० वा.चे सुमारास मौजे क्षेत्रमाहुली ता. जि. सातारा येथे रुबाब बेकरी समोर यातील आरोपी नामे अक्षय संभाजी आढाव वय २१ वर्षे रा. क्षेत्रमाहुली, सातारा हा फिर्यादी नामे ओंकार यशवंत देशमुख रा.क्षेत्रमाहुली, सातारा यांचे बेकरी समोर दारु पिऊन आला व काहीएक कारण नसताना तु मला पैसे देत नाहीस तुला जिवे ठार मारुन टाकीन असे म्हणुन आरोपीने त्याचे हातातील कुऱ्हाड फिर्यादीचे मानेवर मारत असताना फिर्यादी बाजुला झाल्याने कुऱ्हाडीचा वार चुकला फिर्यादी तेथुन पळुन जात असताना आरोपीने पुन्हा फिर्यादीचे पाठीमागे कुऱ्हाड घेवुन जावुन फिर्यादीचे डोक्यात मारुन जखमी केले व फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून वगैरे मजकुरची फिर्यादी वरुन सातारा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास करुन तत्कालीन तपासी अधिकारी श्री. सहा. पोलीस निरीक्षक संदीप मोरे सातारा शहर पोलीस ठाणे यांनी मा. न्यायालयात सदर गुन्हयाचे दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.सदरचा खटला मा. श्री. एस. आर. तांबोळी जिल्हा व सत्र न्यायाधीश (D.J.२) सोो, सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे श्री महेश ना. कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद केसमध्ये एकुण ०७साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा तसेच अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून व जिल्हा सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत मा. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे यांचे दाखले न्यायालयात सादर केलेने समोर आलेला पुरावा ग्राहय मानुन मा. न्यायाधीश सो श्री. एस. आर. तांबोळी जिल्हा व सत्र न्यायाधीश (D.J.२) सोो, सातारा यांनी आज दि.२३/०६/२०२६ रोजी यातील आरोपी यास भा.द.वि.स.क. ३२४ अन्वये ०१ वर्षे ०९ महिने साधी कैद व रु.१२,०००/- दंड, दंड न भरलेस ०६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (सदर दंडाच्या रकमेपैकी रु.१०,०००/- फिर्यादीस नुकसान भरपाई देणेत यावी)
मा. श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा व श्री. सचिन म्हेत्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन पो. कॉ. १८९४ कुमार जाधव, पो.कॉ. ३८६ अमित भरते, म.पो.कॉ.२५७९ मोटे व पो. कॉ. ४२३ प्रतिक पवार सातारा शहर पोलीस स्टेशन यांनी कामकाज पाहिले.




