कराड उत्तरेत मनोज पर्व
सातारा (अली मुजावर )यश मिळावं, यशस्वी व्हावं, असं कुणाला नाही वाटत. पण यासाठी त्यागाची, परिश्रमाची जोड कितीजण देतात ? समाज आणि समाजमनावर अधिराज्य गाजविणारे मोजकेच असतात. या मोजक्यांत मनोजदादा घोरपडे यांचं नाव आघाडीवर नसल तर नवलच. याचा धडधडीत पुरावा त्यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोठ्यावधी विकास कामांच्या पूर्णत्वामुळे पुढं आला आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा वस्तुपाठ त्यांच्या कार्याने मांडला आहे.
शेतकरी, युवक व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत प्रसंगी रस्त्यावर उतरणारे, हाकेला धावून जाणारे नेतृत्व म्हणजे मनोजदादा घोरपडे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकांच्या घरातच नव्हे तर हृदयात विराजमान झालेले नेतृत्व म्हणून शिक्के मोर्तब झालेले आहे. कराड उत्तरचे युवा नेते म्हणून त्यांची ओळख असली असली तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ती जिल्हा परिषद गट वर्णे (ता. सातारा) या ठिकाणी. जनसेवेचा वसा घेणारे घोरपडे कुटुंबीय सर्वसामान्य जनतेसाठी कायम सेवेत आहे.
मनोजदादा घोरपडे यांनी केवळ शासन स्तरावरूनच काम केलं असं नाही, तर त्यांच्या संस्थात्मक परिवारातून अवाढव्य कार्य केलं आहे. कराड उत्तरेमध्ये सर्वसामान्य लोकांना त्यांनी रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मनोजदादा घोरपडे यांना ताकद देऊन कोठ्यावधीची विकास कामे मतदार संघात केली आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोजदादा घोरपडे यांचे पारडे निश्चित जड असून कराड उत्तरे मधील परिवर्तनाची लाट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. असे राजकीय विश्लेषक सांगतात. कराड उत्तर च्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मनोजदादा यांनी विकास कामांचा चढता आलेख ठेवल्याने परिवर्तनाची किमया मनोज दादा घडवणार आहेत.