Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड उत्तरमधील ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 1.25 कोटीचा निधी मंजूर-आमदार मनोज घोरपडे यांची माहिती

कराड उत्तरमधील ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 1.25 कोटीचा निधी मंजूर-आमदार मनोज घोरपडे यांची माहिती

कराड उत्तरमधील ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 1.25 कोटीचा निधी मंजूर-आमदार मनोज घोरपडे यांची माहिती

ना.जयकुमार गोरे यांच्या ग्राम विकास विभागाचा निर्णय

सातारा : प्रतिनिधी राज्य शासनाने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्या ग्रामपंचायतींकडे स्वतःची स्वतंत्र कार्यालयीन इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींसाठी ” मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ” सुरू करण्यात आली आहे. या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी निधी निकषात सुधारणा करत मुदतवाढ देण्यात आली असून, ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा एक महत्वाचा निर्णय ठरणार आहे.

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी अंतर्गत कराड उत्तर मधील ०६ ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामसंस्था इमारतींसाठी 1 करोड 25 लक्ष असा भरीव निधी मंजूर झाला आहे.

मौजे बोरगाव (टकले) ता.  कोरेगाव जि.सातारा. 25 लक्ष, मौजे धावरवाडी ता.  कराड जि.सातारा 20 लक्ष, मौजे खराडे ता.  कराड जि.सातारा 20 लक्ष,

मौजे भुयाचीवाडी ता.  कराड जि. सातारा 20 लक्ष,

मौजे फत्यापुर ता. जि.सातारा 20 लक्ष, मौजे अंगापूर ता.कोरेगाव जि.सातारा 20 लक्ष, असा एकूण 1.25 कोटी निधी मंजूर झाला आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, मा. एकनाथ शिंदे साहेब,मा. जयकुमार गोरे भाऊ यांच्या संकल्पनेतून या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या कार्यालयीन इमारतींमध्ये ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. नैसर्गिक प्रकाश व वायुवीजन, ऊर्जा व जलसाठा यांचा काटकसरीने वापर, पर्जन्य जल पुनर्भरण तसेच पर्यावरणपूरक साहित्य व साधन सामुग्री वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.सदर कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

उर्वरित ग्रामपंचायतींना निधी वितरण टप्प्याटप्प्याने

ग्राम विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार,”२५१५ इतर ग्राम विकास कार्यक्रमा अंतर्गत”ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या मालकीची ग्रामपंचायत इमारत नाही किंवा जीर्ण झालेली इमारत आहे अशा सर्व ग्रामपंचायतींना टप्प्याटप्प्याने निधी वितरीत करणार असल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 286 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket