अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » कराड अर्बन बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सभासदांना ९% लाभांश जाहीर

कराड अर्बन बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सभासदांना ९% लाभांश जाहीर

कराड अर्बन बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सभासदांना ९% लाभांश जाहीर

कराड प्रतिनिधी -कराड अर्बन बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ रोजी कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉल येथे उत्साहपूर्ण, शिस्तबध्द व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष समीर जोशी हे होते. यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे आणि सर्व संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेमध्ये मार्गदर्शन करताना अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले, आजचे युग ‘झेन-झी’चे आहे. त्यामुळे बँकदेखील या नव्या पिढीच्या गरजा नेमक्या ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहे. खाजगी बँकांप्रमाणेच आपणही सर्व सुविधा डिजीटल व ऑनलाईन देणार आहोत. त्यासाठी नजीकच्या काळात नवनवीन व अद्ययावत सॉफ्टवेअर्स कार्यरत करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. बँकेत सध्या २५००० पेक्षा अधिक ग्राहक यू.पी.आय.च्या माध्यमातून ५५००० पेक्षा अधिक व्यवहार दररोज करीत आहेत आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. जास्तीत जास्त सभासद, ग्राहकांना डिजीटल करण्याचे ध्येय येत्या वर्षात ठेवले आहे.

बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम म्हणाले, स्व. कै. डॉ. द. शि. एरम व अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी (भाऊ) यांच्या विचारधारेवरच बँकेची वाटचाल सुरू असून आजमितीस बँकेने रु.६५०० कोटींच्या पुढे व्यवसायाची मजल मारली आहे. गत २० वर्षामध्ये संचालक मंडळामध्ये आम्ही बदल करून तरूण नेतृत्त्वाची फळी निर्माण केली आणि त्याचाच एक भाग म्हणून अध्यक्षपदी समीर जोशी आणि उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची निवड करून या नव्या सक्षम नेतृत्त्वाकडे जबाबदारी सोपविली आहे. माझ्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ अध्यक्षीय कारकिर्दीत पारंपरिक बैंकिंगला न्याय देत बँकिंग क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठीदेखील उत्तम प्रयत्न झाले. मला संचालक मंडळानेदेखील एकदिलाने साथ दिली, त्यामुळे बँकेची ही प्रगती आम्ही एक एकसंध ‘टीम’ म्हणून साध्य करू शकलो आहोत.

व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या सबसिडी मिळणाऱ्या विविध ११ हून अधिक कर्ज योजना आपल्या बँकेमध्ये कार्यान्वित असून कर्ज आधारित भांडवली अनुदान आणि नाबार्डच्या विविध योजनांचा समावेश आहे. सबसिडीच्या या विविध योजनेद्वारे आतापर्यंत रु.२० कोटीपर्यंतचे अनुदान ग्राहकांना मिळाले आहे. मार्च २०२६ अखेरीस एकूण ७२ शाखांपैकी ५२ शाखांचा एन.पी.ए. शून्य टक्के असून निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के इतके राहिले आहे. बँकेच्या ७२ शाखांपैकी एकूण ५८ शाखांनी नफा मिळवला असून ३२ शाखांना रु.१ कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे. नव्याने सुरू केलेल्या ५ शाखांनी ६ महिन्यांमध्ये सुमारे रु.५० कोटींचा व्यवसाय आणि २५०० पेक्षा अधिक ग्राहक बँकेच्या व्यवहारामुळे नव्याने जोडले गेले आहेत. बँकेवर समाजातील सर्व घटकांचा असणारा अढळ विश्वास याद्वारे अधोरेखित झाला आहे.

बँकेचे अध्यक्ष समीर जोशी म्हणाले, बँकेने व्यवसायवृद्धीची परंपरा कायम राखत यंदाही बँकेच्या आजवरच्या इतिहासातील विक्रमी म्हणजेच रु.७४८ कोटींची व्यवसायवाढ सप्टेंबर २०२५ नंतर केवळ सहाच महिन्यांच्या कालावधीत अतिशय नियोजनबद्धरीत्या साध्य केली आहे. एकूण ठेव व्यवहारांनी रु.४००० कोटींचा टप्पा ओलांडला. कर्जव्यवहार रु. २५८५ कोटींचे राहिले आहेत. बँकेला एकूण रुपये ७०.०४ कोटीचा ढोबळ तर आयकर व तरतुदी वजा जाता २६.५२ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील बँकेने आपली नफाक्षमता सिद्ध करीत बँकेने सातत्यपूर्णरीतीने प्रभावी वसुली प्रक्रिया राबविल्याने नक्त एन.पी.ए.चे प्रमाण शून्यतम पातळीवर राखले आहे.

आपली बैंक ECBA (Eligibility Criteria for Business Authorization) निकषांची पूर्तता करीत असल्याने रिझर्व्ह बँकेच्या या नवीन निकषानुसार सध्याच्या कार्यरत असलेल्या एकूण शाखांच्या १५% पर्यंत नवीन शाखा सुरू करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यादृष्टीने बँकेने नवीन शाखा विस्ताराचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे बँकेचे कार्यक्षेत्र ‘संपूर्ण महाराष्ट्र’ करण्याच्या महत्त्वपूर्ण पोटनियम दुरुस्तीला रिझव्र्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार विभागाने मान्यता दिली असल्याने अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणीदेखील आता कराड अर्बनच्या शाखा आपणास दिसतील.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरूवातीस मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी सभासदांचे स्वागत करून सभा सूचनेचे वाचन केले. गतवर्षापेक्षा अधिक निव्वळ नफा मिळवला असल्याने सभासदांना गतवर्षपिक्षा अधिक एक टक्का अधिक म्हणजेच ९ टक्के लाभांश देण्याचा संचालक मंडळाच्या निर्णयास उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

बँकिंग क्षेत्रात डिजीटल व्यवहारांचा वाढता वापर विचारात घेऊन तसेच खर्चातील बचतीद्वारे नफाक्षमतेत वाढ करून भविष्यात सभासदांना सातत्यपूर्णरीतीने उत्तम लाभांश देणे हेच आमचे ध्येय असल्याचे सांगत बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले. विषयपत्रिकेनुसार सभेपुढे सादर केलेल्या सर्व विषयांना सभासदांनी मान्यता देवून सर्व ठराव एकमताने मंजूर केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket