अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » कराड अर्बन बँकेच्यावतीने दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे वितरण

कराड अर्बन बँकेच्यावतीने दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे वितरण

कराड अर्बन बँकेच्यावतीने दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे वितरण

कराड प्रतिनिधी -दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड बँकेच्या वतीने साडेतीन मुहुतपैिकी एक समजल्या जाणाऱ्या दसरा सणाच्या शुभ मुहुर्तावर बँकेच्या ग्राहकांना १५ कोटी पर्यंतचे विविध वाहन कर्ज बँकेच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. त्यापैकी कराड शहरातील वाहनांचे पूजन श्री. समीर जोशी, डॉ.अनिल लाहोटी, संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांचे हस्ते करुन वाहनांचे वितरण करण्यात आले.

बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने सामाजीक उपक्रमांबरोबरच ग्राहकांना कमी व्याजदरात वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. बँकेने नवीन वाहन खरेदीसाठी ग्राहकांना विविध शाखांच्या माध्यमातून एकूण १५ कोटी कर्जाचे वितरण केलेले असून यापैकी कराड विभागातून सुमारे ५ कोटी वाहन कर्जाचे वितरण करण्यात आलेले आहे. बँकेने नवीन वाहन खरेदीसाठी ग्राहकांचे हित लक्षात घेत घरगुती वाहन खरेदीसाठी ८.५०% व कमर्शिअल वाहन खरेदीसाठी ९.००% अशी योजना राबविली असून याला ग्राहकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. जीएसटीमधील कपातीचा वाहन खरेदी करताना ग्राहकांना चांगलाच फायदा झाला आहे.

नुकत्याच संपलेल्या अर्धवर्षाअखेरीस वार्षिक नियोजनाप्रमाणे बँकेने एकूण रुपये ५९०० कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण करीत नेट एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के कायम ठेवले आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्व सेवकांच्या सामुहिक योगदानामुळे हे यश मिळवता आले आहे, असे उद्‌गार मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी वाहन वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

कराड अर्बन बँक ग्राहकांना फक्त आर्थिक पतपुरवठा करत नाही तर योग्य सल्ला देवून आर्थिक शिस्त सुद्धा लावते. यामुळे ग्राहकांना आर्थिक प्रगती करणे सोपे जाते. कराड अर्बन बँक नेहमीच सर्वोत्तम ग्राहक सेवा देत आली असल्याचे समाधान वाहनधारकांनी व्यक्त केले.

यावेळी बँकेचे कराड शहर व कराड ग्रामीणचे उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे, विजय पाटील, शाखा अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket