माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण काँग्रेसचा संवाद मेळावा
कराड : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कराड दक्षिण मधील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी १८ डिसेंबर २०२४ रोजी “कार्यकर्ता संवाद मेळावा” आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील संवाद साधणार आहेत. हा मेळावा आनंद मल्टीपर्पज हॉल, पाचवडेश्वर ता. कराड येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कराड दक्षिण महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस, मलकापूर शहर काँग्रेस, अनुसूचित जाती, अल्पसंख्यांक विभाग, सेवादल तसेच सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे.