Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत पार

कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत पार

कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत पार

सर्व विषय मंजूर / महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती

कराड / प्रतिनिधी:- कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची ७३ वी वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. नवीन इमारत बांधकाम, तळमावले शाखा जागा खरेदी व फलटण शाखेस मान्यता आदी प्रमुख विषय मंजूर झाले. सभेच्या अध्यक्ष स्थानी वैशाली राजेंद्र पवार होत्या.

        शिक्षकांच्या सोसायटी किंवा बँकेच्या सभा म्हणजे नुसता राडाच. हे सुत्र सर्वज्ञात. त्यातच शिक्षकांच्या सोशल मिडियावर सत्ताधारी गटावर गेल्या आठवड्यापासून चिखलफेक सुरु होतीच. या आरोपांना सत्ताधारी सोशल मिडीयावर कसलेही उत्तर देत नव्हते त्यामुळे जनरल सभा वादळी होणार अशी शिक्षकांच्यात चर्चा होतीच. विरोधकांनी वातावरण निर्मिती करून सभेला गर्दी सुद्धा जमविली. मात्र सत्ताधारी संचालक मंडळाने अभ्यास पूर्ण उत्तरे दिल्याने विरोधकांची हवा निघून गेली. 

वार्षिक सभेपुढील कळीचा मुद्दा ठरणारा कराड मुख्य शाखा नुतनीकरण हा मुद्दा होता. याच मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार हे नक्की होते. परंतु संचालक मंडळा बरोबर सामान्य सभासदांनी इमारत व्हावी हीच मागणी उचलून धरली. त्यातच संचालक दिनेश थोरात यांनी इमारत नुतनीकरण बाबत मुद्देसूद विवेचन केल्याने सभागृहातून टाळ्यांच्या गजरात इमारत नूतनीकरणाचा विषय मंजूर झाला.

सोशल मिडीयावर झालेल्या आरोपांना सुद्धा थोरात यांनी उत्तरे देऊन सभागृहाची मने जिंकली. महिला चेअरमन असल्याने आपण सभा गुंडाळून नेहु असे विरोधी गटाला वाटत असताना चातुर्याने उत्तरे देऊन चेअरमन वैशाली पवार यांनी महिलांची व्हावा मिळविली.

  तानाजी पाटील, पांडुरंग माने, ज्ञानबा ढापरे, तातोबा सावंत,संजय नांगरे,रमेश देसाई,भालचंद्र थोरात, दत्ता पाटील, प्रदीप रवलेकर, शहाजी यादव, शशिकांत कांबळे, महेंद्र जानुगडे, नितीन नलवडे, अरुण पाटील,सुभाष शेवाळे, संतोष निकम, रमेश पोतदार, आनंदा देशमुख, गणेश जाधव, जहंगिर पटेल सभेत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.

 व्हा.चेअरमन दत्ता जाधव, दिनेश थोरात, शशिकांत तोडकर,रमेश जाधव, अंकुश नांगरे, नीलम नायकवडी, भारत देवकांत,धनाजी कोळी,सागर पाटोळे तसेच अन्य संचालकांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अहवाल वाचन श्रीधर यादव यांनी केले. उपस्थितांचे स्वागत वैशाली पवार यांनी केले तर आभार अंकुश नांगरे यांनी मानले.    

चौकट- संस्थेच्या ७३ वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला चेअरमन असताना वार्षिक सभा होत होती.त्यामुळे सभेला महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला चेअरमन यांनी आपल्या वक्तृत्वाने सरावाची मने जिंकली.

पांडुरंग माने हे सभासद गेले आठ वर्षापासून जुन्या इमारतीवर पैसे खर्च करू नका अशी भूमिका मांडत होते. यावेळी त्यांनी पोटतिडकीने इमारत व्हावी म्हणून भूमिका मांडली. जेव्हा हा विषय मंजूर झाला तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे कराड

Live Cricket