कराड दक्षिणेत पृथ्वीराजअन् ‘अतुल’बाबांमध्ये होणार हाय व्होल्टेज लढत,डॉ.अतुल भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज
सातारा :कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून देशभर ओळखला जातो. महायुतीचे कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी चांगलीच तयारी केली आहे. यावेळेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी डॉ.अतुल भोसले यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी डॉ. सुरेश भोसले, भाजप खासदार उदयनराजे भोसले, विक्रम पावसकर, वारकरी बांधव,माजी सैनिक, महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.