नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » काळुबाईच्या दर्शनाला उसळला भक्तांचा महापूर

काळुबाईच्या दर्शनाला उसळला भक्तांचा महापूर

काळुबाईच्या दर्शनाला उसळला भक्तांचा महापूर

मांढरदेव प्रतिनिधी-(राजगुरू कोचळे) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांन, तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत. अशातच या कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदारगडावर आई कळुबाई देवीचा दर्शनाला रविवारी तिच्या भक्तांचा महापूर उसळल्याचे पाहावयास मिळाले.बातमी सविस्तर 

मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सव मागील सात दिवसांपासून सुरू आहे.घटस्थापनेपासून ते सहाव्या माळेपर्यंत हजारो भाविक देवीच्या दर्शनाला रोज येत आहेत.मागील दोन दिवसापासून मांढरदेव येथील वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेला असून.गर्द दाट दुखे कडाक्याची थंडी आणि पावसाची संततधार येत असताना सुद्धा नवरात्र उत्सवातील सातव्या माळेला रविवारी भाविकांनी देवीच्या दर्शनाला प्रचंड अशी गर्दी केली.अंदाजे दोन लाखाहून जास्त भाविक देवीच्या दर्शनाला आल्याचे पहावयास मिळाले.आणि या गर्दीचे ते दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाला गडावर भक्तांचा महापूर उसळल्या सारखे वाटत होते.

          सतत येणाऱ्या पावसामुळे व दाट दुखामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे आणि त्यातच गडावर झालेली भक्तांची लाखोंच्या संख्येने गर्दी यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या.मांढरदेवीला येणारे वाई व भोर दोन्ही घाट मार्गामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले.परंतु प्रचंड गर्दी झालेले असताना सुद्धा रस्त्याने शिस्तीमध्ये प्रवास करून देवीचे दर्शन घेऊन भाविक सुखरूप परतताना पहावयास मिळत होते.देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते.आणि त्यामुळे त्यांना जो थंडीचा,पावसाचा गर्दीचा त्रास झाला होता तो ते पूर्णपणे विसरून गेल्याचे भासत होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket