वृक्षारोपण करणे काळाची गरज- सचिव डी ए पाटील
तांबवे-पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व जमिनीची होणारी धुप थांबविण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव डी. ए.पाटील यांनी केले सदाशिवगड(हजारमाची )ता. कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या वृक्षारोपण उपक्रमावेळी ते बोलत होते.यावेळी संस्था संचालक राजेंद्र काटवटे, मुख्याध्यापक के आर साठे,ए आर मोरे,डी पी पवार,व्ही एच कदम,एम बी पानवळ माजी मुख्याध्यापक जी बी देशमाने पालक संगीता कुंभार ,सपना कोरडे , वैशाली जगताप , संतोष कुंभार, ज्योतीराम कुंभार अविनाश कोरडे,शिक्षक अंजली पाटील, शशिकला पोळ, सुवर्णा शिंगारे, अनिल जाधव ,तानाजी राजमाने, सुरेश वेताळ , राजगोंडा अपिने,संजय गोसावी ,चंद्रकांत डुबल ,ओंकार रांगोळे यांची उपस्थिती होती.
डी ए पाटील म्हणाले पर्यावरणाच समतोल बिघडतोय तो राखण्यासाठी प्रत्येकांने एकतरी झाड लावून ते जगवले पाहिजे. यावेळी शाळा परीसरात पन्नास झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका मनिषा पानवळ यांनी सुत्रसंचलन सुरेश वेताळ व आभार आर एम अपिने यांनी मानले.