संगीत ही कला व्यक्तिला आनंददायी परिपूर्ण जीवन देते: काका पाटील
सातारा दि.1 ( प्रतिनिधी) संगीत ही एक कला असून ती प्रत्येकाने आत्मसात करावी तसेच त्यासाठी साधना करावी असे प्रतिपादन काका पाटील यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित गुलदस्ता या रंगारंग सदाबहार हिंदी व मराठी गीतांच्या मैफिलीत काढले.
सदर कार्यक्रमास डॉ.कामिनी पाटील, सुरेखा शेजवळ, काका पाटील, शिरीष चिटणीस अनिल वाळिंबे, रमेश वेलणकर, विजय साबळे, डॉ. सुनील पटवर्धन आदि मान्यवर उपस्थित होते.
यापुढे काका पाटील म्हणाले गुलदस्ता या मैफिली मध्ये प्रत्येक गायक कलाकाराने उत्कृष्ट गायन केले आहे. या क्लबच्या सीनियर गायकांनी तर अप्रतिम गाणी गायली असून नवोदित कलाकारांनी सुद्धा आपल्या प्रतिभेची छाप रसिक श्रोत्यांच्या मनावर पाडली आहे. याचे सर्व श्रेय विजय साबळे यांना जात असून ते प्रत्येक गायक कलाकाराला सूट होईल असेच गाणे गायचा सल्ला देतात. या ग्रुपमध्ये सातारा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आपल्या गाण्याची कला जोपासण्यासाठी येत असतात.
यावेळी त्यांनी शिरीष चिटणीस नेहमीच अशा गीत मैफिलीस मोलाचे सहकार्य देत असतात त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या सहकार्यामुळेच सातारची संस्कृती वारसा जपण्याचा प्रयत्न होत आहे.असे म्हणाले
शिरीष चिटणीस म्हणाले सध्या देशामध्ये कराओके चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांसाठी होत असून त्यातून समाजाला प्रेरणा व दिशा देण्याचे काम अविरत चालू आहे. संगीत जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते व एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते सदर प्रसंगी या कार्यक्रमासाठी आलेल्या नवीन गायकांचे त्यांनी स्वागत करून प्रोत्साहन दिले. व आपणही या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. २८ सप्टेंबर लता मंगेशकर यांचा जल्मदिवस.९५ व्या त्यांच्या जल्मदिनी हा संगीतमय कार्यक्रम होत असताना त्यांच्या आठवणी जतन करणे आणि नव्या पिढीला त्यांचे योगदान सांगणे महत्त्वाचे.
अनिल वाळिंबे म्हणाले जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी होतो तसेच मन प्रसन्न राहते आजही अनेक जुने गीते रसिक श्रोत्यांना भुरळ घालतात. यावेळी विजय साबळे यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या गुलदस्ता कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ कामिनी पाटील,सुरेखा शेजवळ,काका पाटील,रमेश वेलणकर,विजय साबळे, अनिल वालिंबे,शिरीष चिटणीस,डॉ सुनील पटवर्धन आदी मान्यवरांचे हस्ते झाले.
असून या गीत मैफिलीमध्ये हिंदी व मराठी प्रेम गीत, विरह गीत, सोलो गीत, ड्युएट गीत, गझल,फर्माईश, तसेच इतर गीत प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
गुलदस्ता या कार्यक्रमाची सुरुवात मंजुषा पोतनीस
यांच्या “आपकी नजरोने समझा या सुमधुर गीताने झाली यानंतर मैफिली मध्ये
मिलिंद हर्षे ” जीवन से भरी तेरी आँखे” बापूलाल सुतार यांचे” दिल का सूना साज ” ममता नरहरी ” रंग दिल की धडकन भि लाती तो होगी “कला चंद ” बाहो मे चले आओ ” सुषमा बगाडे ” ये राते नयी पुरानी ” उमाकांत पाटील “आपके अनुरोध पे ” उद्धव इंगवले ” छूकर मेरे मन को “दिपाली घाडगे ” सून साहिबा सून प्यार की धुन ” यासारख्या गीतांना रसिक श्रोत्यांच्या पसंतीची पावती मिळाली.
यानंतर नागेंद्र पाटील यांचे ” जाने क्या सोच कर नही गुजरा ” उमेश खोले “कही दूर जब दिन ढल जाये ” चंद्रशेखर बोकील ” मानो हो तुम बेहद हसी ” विठ्ठल जाधव ” एक हसी शाम को दिल मेरा खो गया” अरुण नाझरे ” हम बेवफा हरगिज ना थे ”
शुभांगी मुरुडकर ” बिंदिया चमकेगी ” इंद्रायणी कुलकर्णी ” रहे ना रहे हम ” यासारख्या गीतांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. डॉ. सुनील पटवर्धन ” हुस्न वाले तेरा जवाब नही ” व वनिता कुंभार यांच्या ” गोऱ्या गोऱ्या गालावरी ” तसेच उमाकांत पाटील व मंजिरी दीक्षित ” ये राते ये मौसम नदी का किनारा ” यासारख्या हृदयस्पर्शी गीतांना वन्स मोर मिळाला. ड्युएट गाण्यांमध्ये विजय साबळे व सुषमा बगाडे यांचे अजरामर गीत ” लुटे कोई मन का नगर”डॉ. सुनील पटवर्धन व वनिता कुंभार ” ये मैंने कसम ली ये तुने कसम ली” शिरीष खुटाळे व मंजिरी दीक्षित ” जो भी बुरा भला है अल्लाह जानता है” ही अप्रतिम गझल सादर केली
विजय साबळे व इंद्रायणी कुलकर्णी ” धीरे धीरे बोल कोई सून ना ले” ” डॉ.सुनील पटवर्धन व मंजिरी दीक्षित ” तेरे चेहरे से नजर नही हटती” चंद्रशेखर बोकील व मंजुषा पोतनीस ” ओ रात के मुसाफिर ” नागेंद्र पाटील व दिपाली घाडगे ” पन्ना की तमन्ना है कि ” कला चंद व मिलिंद हर्षे तेरे मेरे मिलन की ये रैना ” डॉ. सुनील पटवर्धन व मंजुषा पोतनीस ” तुम्हारी नजर क्यो खफा हो गई ” तसेच ऐश्वर्या गव्हाणे गेस्ट परफॉर्मन्स गीत “अजीब दास्ता है ये कहा शुरु कहा खतम ” यासारख्या डुएट व फर्माईश गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.या कार्यक्रमाचा शेवट विजय साबळे यांच्या मनमोहक ” भुली हुई यादो मुझे इतना ना सताओ ” या गीताने झाला. या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन विजय साबळे यांनी केले असून कार्यक्रमास अक्षता शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभली होती
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले असून कार्यक्रमाचे निवेदन बापूलाल सुतार यांनी केले व आग्नेश शिंदे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास संगीत, साहित्य, कला, नृत्य, आर्थिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.