फक्त २५ रुपयांत आयुष्यभराचा जीवन विमा: पोस्टाची योजना
आजकाल बाजारात महागडे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी विमा घेण्याच्या विचारात कमी पडतात. पण पोस्ट विभागाची एक अशी जीवन विमा योजना आहे, जी फक्त २५ रुपयांमध्ये मिळवता येते.
पोस्टाची जीवन विमा योजना (RPLI) – १९९५ पासून सुरू
१९९५ साली सुरू झालेली ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) योजना ग्रामीण भागातील असुरक्षित गट, महिला कामगार आणि शेतकऱ्यांसाठी जीवन विमा संरक्षण प्रदान करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी सुलभ आणि किफायतशीर आहे.
केवळ २५ रुपयांत विमा मिळवा
पोस्टाच्या या जीवन विमा योजनेंतर्गत विमा रक्कम १० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकते. कोणताही ग्रामीण नागरिक, शेतकरी किंवा मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही विमा मिळवणे खूप सोपे आहे. टपाल विभागाद्वारे चालवली जाणारी ही पॉलिसी सर्वात लोकप्रिय आहे, विशेषतः १५ आणि २० वर्षांच्या मुदतीच्या योजनांमध्ये. या योजनांमध्ये ५ हजार रुपयांच्या विमा रकमेसाठी प्रीमियम २५ रुपयांपासून सुरू होतो.
विविध योजना उपलब्ध
पोस्टाच्या जीवन विमा योजनेंतर्गत अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यात समाविष्ट आहेत:
▪️ग्रामीण अंत्योदय योजना
▪️ग्राम सुरक्षा योजना
▪️बाल जीवन विमा योजना
▪️ग्राम सुमंगल योजना
▪️ग्राम सुविधा योजना
यापैकी काही योजना फक्त जीवन विमा संरक्षण देतात, तर काही योजना गुंतवणूक फायदे देखील देतात. उदाहरणार्थ, बाल जीवन विमा योजना मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. या योजनेद्वारे मुलांचे शिक्षण आणि भविष्य कठीण काळातही सुरक्षित राहते, असे सुनिश्चित केले जाते.ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि किफायतशीर संधी आहे, ज्यामुळे ते आयुष्यभराचे जीवन विमा कव्हरेज सहजपणे मिळवू शकतात.




